Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१३)

स्थापना केली. या राज्याचा विस्तार सर्व महाराष्ट्र देशभर असून उत्तरेस नर्मदानदी, दक्षिणेस रुष्णानदी, पश्चिमेस सह्याद्रपर्वत व पूर्वेस तेलंगणचे राज्य व गोंडवनचे अरण्य, ह्या त्याच्या चतु:सिमा होत्या. सुलतान महंमद याच्या कारकीर्दीत वन्हाड व खानदेश मिळून एक सुभेदार असून त्यांचे राहण्याचे मुख्य ठिकाण इलीचपूर हे होते व इमाद उलमुल्क या नांवाचा एक सुभेदार ह्या प्रदेशाचा कारभार पहात होता; परंतु दक्षिणेतील उपरीनिर्दिष्ट सरदार मंडळींनी बंड केल्यानंतर या सरदाराने आपले राहण्याचे मुरुष ठाणें एलीचपूर आणि आपला सर्व कारभार - सोडिला; आणि तिकडून निघून तो त्यावेळी गुजराथेत मोडत असलेल्या *नंदुरचार या गांवीं येऊन राहिला; आणि वऱ्हाडातील इतर अधिकारी मंडळी या दक्षिणेतील मंडवाल्या सरदार मंडळीस मिळून हैं बंड यशम्पी झाले व सुलतान महंमद यानें बहामनी राज्याचे स्वातंत्र मान्य केलें. ( इ० सन १३५१ ) आणि *नंदूरबार व सुलतानपूर या दोन पश्चिमेकडील जिल्ह्यांचा प्रदेशच काय ती दिल्लीपतीच्या अमलाखाली राहिला; आणि इ० सन १३७० पर्यंत हीच कावस्था चालू राहिली; यावर्षी दिल्लीचा सुलतान फिरोज तुक हा गुजराथेत असत एकदां शिकारीस गेला. त्यावेळी त्याची व त्याच्या लोकांची चुकामूक होऊन सुलतान एकटाच एकीकडे गेला, ते मलिकराजा फल्की या नांवाच्या सुलतानाच्या खास मार्गेन चौक असलेल्या एका सुनी पंथी तरुण आरय मनुष्यानें त्याला वेळेवर


 टीप:- १ इलीचपूर हे तालुक्याचें व सबडिव्हिजनचे ठिकाण, वन्हाडांत जम रावती जिल्ह्यांत उमरावतीहून सडकेने अजमासे ३२ मैल आहे. व जी. आय. पी. रेलवेच्या नागपूर लाइनीवरील मूर्तिजापूर स्टेशनपासून इलीचपूरपर्यंत आगगाडीचा फोटा गेला आहे. इलीचपूर हे जुने गांव असून तेथून अजमासें तीन मैलांवर परतवाडा हा नवा गांव वसलेला आहे, व धर्येत उत्तम सड़क असून अजमासें मधोमध रेलवेस्टेशन आहे. इलीचपूर येथे पूर्ववैभवाचे अवशेष आजतागायत अस्तित्वांत आहेत.

 *टीप:-२ नंदुरबार हे पश्चिम खानदेशतिलि तालुक्याचे ठिकाण धुळयापासून सडकेनें अजमायें ३२ मैलांवर वायव्येस असून, तें तापी व्हॅली रेलवेवर एक स्टेशन आहे. हे गांव नंदगवळी याने वसविले अशी आख्यायिका आहे.

 +टीप:- ३ सुलतानपूर हे गांव पश्चिम खानदेशांत शहा तालुक्यांत शहाद्या- पासून अजमासें १३ मैलांवर आहे व किल्ला व त्याच्या भिंती यांचे अवशेष धुळ्यापासून सडकेनें वायव्येस ४८ मैलांवर व ताप्ती गांव हल्लीं मोडकळीस आलेले असून तेथील अद्यापि अस्तित्वात आहेत, शहा हा गांव व्हॅली रेलवेच्या जळगाव ते या मार्गावरील दोंडाईने या स्टेशनपासून अजमासे वीस मैल आहे.