अहमदशहाने त्याचा पराजय करून ते मोडून टाकिलें व विजयी होऊन तो आपली राजधानी पाटण येथे येऊ लागला यावेळी मार्गात त्याने एकाठिकाणी मुक्काम केला; तेव्हा तेथील पाणी व आसपासच्या जमीनीची सुपिकता पाहून याठिकाणी आपली राजधानी करावी असे ठरविले व नवीन शहर वसवून' त्यास आपल्या नावावरून "अहमदाबाद" हे नांव दिलें (इ०सन १४१२३) व यावेळेपासून पाटण ऐवजी अहमदाबाद ही गुजराथ प्रांताची राजधानी झाली.
त्यानंतर अहमदशहाचा चुलत भाऊ फिरोजखान पार्ने, इडरची राणा रणम याच्या मदतीने पुन्हा थंड केले परंतु ते शहाने मोडून टाकून " फिरोजखान यास पळून' जाण्यास व रणमला शरण येण्यास भाग पाडले. त्यानंतर माळव्याचा सुलतान हुसंग शहा हा आपल्या राज्यांतील बंड बोगस आणि आपल्या शत्रूंस आश्रय" देतो) आणि आपल्या एका शत्रूस सौराष्ट्र देशाचा शूर राज्यकर्ता गार याने आश्रय दिला आहे, असे त्यास कळल्यावरून त्याने त्या उभयतांवर स्वारी केली, त्यांत विजयी होऊन त्यावर व परत जातांना इतर कित्येक हिंदू राज्यकत्यावर, त्याने खंडण्या बसविल्या; तथापि अशा प्रकारच्या अनेक विजयामुळे नव्हे तर हिंदूधर्माचा उच्छेद करण्याकरिता त्यानें जे विशेष प्रकारचे इलाज अमलांत आणिले त्यामुळे त्याचे नांव गुजराथच्या इतिहासात अजरामर झाले आहे.
अहमदशहा याने ३० सन १४१४ मध्ये ताज उलमुल्क या नावाच्या एका अत्यंत धर्माभिमानी मनुष्यास, मुसलमानी धर्मवृद्धीच्या व धर्मेसजनाच्या स्वतंत्र खात्यावर मुख्य नेमून, त्यास मूर्तिपूजकांच्या देवालयांचा व मूर्तीचा दरोबस्त नाश करून टाकण्यास हुकूम दिला व त्या बहादुरावेही हा हुकूम मोठ्या उत्साहाने व काळजीने
१ टीप:-सुलतान अहंमदशहा यानें हैं शहर शेख महंमद खतूगंज यक्षी या नांवाच्या एका मनुष्याच्या मसलतीने वसविले असून, त्याठिकाणी पूर्वी कर्णावती व श्रीनगर- अशी दोन गावं होतीं. अहंमदाबाद हे शहर साबरमती नदीच्या पूर्वकांठावर वसलेले असून तिचे पौराणिक कालांतील नांव " साभ्रमती" हे आहे व पद्मपुराणांत या नदीचें पुष्कळ महत्व वर्णन केलेले आहे. साबरमती हैं नांव साबर व हातमती, या दोन नया मिळून एका नविन चालू आहे व त्यांतील साबर हो नही तोडगडांतून निघून पुढे तिला आमनगरा- जवळ हातमती ही नदी मिळाली आहे व तेथून पुढे तिला " साबरमती " हैं संयुक्त नवि मिळालेले आहे. अहमदाबाद येथें सात मेल घेराचा विस्तीर्ण कोट, मद्र अथवा मद्दर या नांवाचा अंतरकोट, मोठमोठ्या इमारती व मशीदी खोरे प्रेक्षणीय स्थळे असून तेथील पूर्ववैभव, अवशेषरूपानें आजतागायत अस्तित्वांत आहे.
२५