Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९४ )

अमलांत आणला. गुजराथ देश, हा मूळचा हिंदूलोकांचा असल्यानें म्यांत ठिकठिकाण अनेक देवस्थाने होती, त्यामुळे चोहोंकडे देवळे पाडण्याचा सारखा सपाटा सुरू होऊन- आणि त्याठिकाणी मशीदी उभारिल्या जाऊन सर्व देशमर अतीशय खळबळ उडून गेली. शिवाय हिंदू राज्य खालसा करीत राहण्याची स्थति मर पडली, आणि अनेक जमीन- दार व गिराशिये हिंदू मंडळीस आपल्या स्वातंत्र्यास मुकावें लागलें; त्यामुळें या खरबीस फारच जोराचे चालन मिळाले होते; एकंदरीत पाहता, अहंमदशहाच्या कारकीर्दीचा बहुतेक काळ, आसपासच्या राज्यकत्यांशी युद्ध करण्यांत, आणि शेवटीं शेवटीं उत्तर कोकणमध्यें बहामनी राज्यकर्त्यांबरोबर झगडण्यात खर्च झालेला असून अतीशय अल्पप्रमाणातच त्यास शांतता व विश्रांति, यांचा लाभ मिळालेला होता; तथापि हा शहा यशस्वी होता, शिवाय त्याने रजपुतांशी शरीरसंबंध केलेले असून, तो अतीशय न्यायी, अशी त्याची कीर्ति होती. त्याच्या न्यायीपणाचे एक असे उदाहरण उपलब्ध आहे की, एकदां त्याच्या जावयाने एका मनुष्याचा खून केला; तेव्हां हैं प्रकरण काजीकडे न्याय निवडण्याकरितां गेलें; त्यावेळी काजीनें, हा बादशहाचा जांबई " हणून त्यास फक्त पीस मोहोरा दंड करून, खून झालेल्या मनुष्याच्या कुटुं यांतील मंडळींची त्याने समजूत केली; व हे प्रकरण आपसांत दाबून टाकिले; परंतु त्यानं- तर ही गोष्ट अहंमदशहास समजली, तेव्हा त्यास,"हा अन्याय झाला," असे वाटून अती राग आला आणि त्याने ताबडतोब पुन्हां स्वतः चौकशी करून व हा खून आपल्या जावयानेच केलेला आहे अशाबद्दल पुन्हां आपली स्वतःची खात्री करून घेऊन | त्यानें ताबडतोच आपल्या जावयास सूळी देण्याचा हुकम देऊन तो अमलांत आणिला; त्यावेळीं तो ह्मणाला: “ फक्त वीस मोहोरच्या दंडावरच जर खुनी मनुष्य अशारीतीनें सुटत जाईल तर आज शेंकडों श्रीमंत लोक हजारों खून करून दोषमुक्त होत जातील. " या एकाच गोष्टीवरून त्याची कठोर व कट्टर न्यायप्रियता व्यक्त होते. हा सुलतान इ० सन १४४३ मध्ये ( ता० जुलई ) अहमदाबाद येथें मृत्यू पावला; व त्याचे शुक्रवारी मशीदी समोरील बाजारांत " हजीरा " या नांवाच्या प्रसिद्ध मशीदीत दफन करण्यांत आले असून त्याठिकाणी त्याची सुंदर कबर आहे.

 अहमदशहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा महंमदशहा हा गादीवर आला. या शहाच्या कारकीर्दीच्या प्रारंभीच त्याचा, आणि इरडच्या राज्यकर्त्यांचा तंटा लागून काहीं


 टीप:- इडर हैं, राजपुताना आणि मुंबई इलाखा, यांच्यामध्ये एक संस्थान असून इडर हेंच स्था संस्थानच्या राजधानीचे शहर अहमदाबादच्या ईशान्येश ६४ मैलांवर आहे व ते महीकांठा एजन्सीतील एक प्रमुख संस्थान आहे.