आणि त्यामुळे लागलींच त्याचा अंत होऊन, त्या समाधानाने अहंमदशहानें आपले डोळे थंड करून घेतले.
मुरशहाच्या एकंदर जीवनचरित्रावरून पाहता, तो हिंदूधर्माचा द्वेष्टा होता आणि हिंदूधर्म व हिंदुधर्मी राजेरजवाडे, यांच्या बाबतीत तो कठोरपणाने वागला होता, यांत तर कांहींच संशय नाहीं; तथापि माळवा व खानदेश येथील सुलतानांवर स्वान्या करून त्यांच्यापासूनही त्यानें चोपून खंडण्या घेतल्या; यावरून आपल्या महत्वस्थापनेच्या खटपटीत हिंदूप्रमाणेच मुसलमानराज्यकर्त्यांचीही त्याने उपेक्षा केली नाहीं; यावरून स्व- जातीशी वागतांना त्यानें- धार्मिक बाबतीशिवाय भेदभाव दाखविला असेही ह्मणतां येणार नाही; तथापि त्याचा खाजगी आयुष्यक्रम तसा कठोरपणाचा नव्हता. उलटपक्षीं तो मनाचा अतीशय कोंवळा होता; व त्याचें मुलांनातवांवर अढळ व असाधारण प्रेम होतें, असें दिसतें. आडवें आलें, ह्मणजे ते परके, पाठचेंच काय पण पोटचें असले तरी कापून काढून आपला जीव जगवून निर्धास्त होणारी, अशी त्याच्या मनाची ठेवण नसून पोटचें जगून त्याने आपला जीव घेतला तरी पत्करला, अशी होती; त्यामुळे तातार- खान यानें त्यास प्रतिबंधांत ठेविल्यानंतर, त्याच स्थितीत असतांनासुद्धां हे " चिरं- जीव " मृत्यू पावल्याबद्दल त्यास अत्यंत दुःख झालें, तो अतीशय उदास झाला, आणि त्याच्या अमीरउमरावांनीं त्याला चार समाधानाच्या गोष्टी सांगून पुन्हा राजसूत्रे हातीं घेण्याबद्दल आग्रह केला, तेव्हांच तो पुन्हां पूर्वीप्रमाणे राज्यकारभार पाहूं लागला तथापि त्याच्या अपवादकारक प्रेमळ स्वभावाचें प्रत्यंतर त्या पुढील काळात घडलेले आहे. चिरंजिवानीं त्यास फक्त प्रतिबंधांत ठेविले; पण नातवाची मजल त्याच्याही पुढे गेली व त्याने आजोबास विष दिलें !! तथापि तें घेतांनाही या नातवाविषयीचे त्याचे प्रेम तिळमात्रही ढळलें नाहीं, ह्मणजे, पीप देणारा निर्दय नातू डोळ्यापुढे उभा असतां, त्याच नातवावर अढळ प्रेम ठेवून कायम राखून त्याचे कल्याण चिंतून त्यास " मला ठार मारिलेंस तरी हरकत नाहीं; पण तूं या राज्यसुखाचा पुष्कळ वर्षे उपभोग घे, " असा आशीर्वाद देऊन, बोधाच्या चार गोष्टी सांगून, आणि त्याचें कल्याण करण्याकरितां ईश्वराची करुणा भाकून मुज्झशहा मोठ्या शांतपणाने विषाचा पेला घेतो आणि मृत्यू पावतो, ही गोष्ट कादंबरीतही पचण्यास जड जाईल, इतकी अद्भूत, अगम्य व अपवादकारक आहे; पण पण हीच गोष्ट अशाप्रकारचें सत्य-अगदीं त्रिवार सत्य असे घडलेलें हैं एकच उदाहरण इतिहासात आढळून येत आहे.
मुज्फ्रशहाचा नाश करून अहमदशहा गादीवर आला, त्यावेळीं तो ३१ वर्षांचा होता. हा शहाही आपल्या वडील व आजोबाप्रमाणेच शूर होता. त्यास फिरोजखान या नांवाचा एक चुलतभाऊ होता; त्यानें राज्यप्राप्तीकरितां भडोच येथें बंड केले; परंतु