शहाजवळ येऊन राहिला होता व त्यानेही आपल्या वडिलांस राज्यवृद्धी करण्याच्या कामी पुष्कळ मदत केली होती. इतक्यांतच दिल्ली येथील भानगडी ऐकून प्रसिद्ध मॉगल बादशहा तैमूरलंग यानें दिल्लीवर स्वारी केली; आणि दिल्लीचे तख्त बळकाविलें. ही संधी साधून मुकरशहानें आपल्या नांवाचे नाणे पाडिलें; आपल्या नांवाची द्वाही फिरविली; आपल्या नांवानें मशीदीतून खुल्या वाचविण्यास सुरवात केली व तिकडील प्रदेशाचा तो राजरोस पूर्ण स्वतंत्र राज्यकर्ता बनला.
तथापि त्याचा शूर व महत्वाकांक्षी मुलगा तातारखान याचे तेवढ्यानेही समाधान- झालें नाहीं. आपल्या षडिलांनीं एवढ्यावरच संतुष्ट न राहता, आपल्या मदतीने दिल्लीवर स्वारी करावी, असे त्याचे मत होते; व तो तसा आपल्या वडिलांस आग्रहही करीत होता; आणि असा आग्रह करण्यांत, आपला प्रतिस्पर्धी जो वजीर मलिक इकबालखान याचा सूड उगवावा, असाही एक त्याचा प्रधानउद्देश होता, परंतु त्याचें झणणे मुफरशहास- योग्य वाटले नाही; तसें करण्यास हा प्रसंग अनुकूल आहे असें वाटलें नाहीं; झणून त्यानें आपल्या मुलाच्या इच्छेप्रमाणें वागण्याचे नाकारिलें; त्यामुळे या पितापुत्रांमध्यें विकल्प उत्पन्न होऊन तातारखानाने आपल्या वडिलांस प्रतिबंधांन ठेवून राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली; व दिल्लीवर चाल करून जाण्याची तो तयारी करूं लागला; परंतु इतक्यांतच तो आजारी पडला आणि त्यांतच अखेरीस त्याचा अंत होऊन मुज्करशहा पुन्हां राज्यावर आला.
तातारखानाचा मुलगा आणि मुज्करशहाचा नातू अहमदखान हाही मोठा शूर व पराक्रमी होता. यावेळी गुजराथ प्रांतांत आशावळच्या कोळीलोकांनी मोठा पुंडावा माजविला होता; त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याकरितां मुज्फूरशहानें आपल्या या नातवास तिकडे पाठविलें. त्याप्रमाणें त्यानें त्या कोळीलोकांवर चाल करून जाऊन त्यांचा बंडावा मोडून टाकिला; तथापि याच वेळेपासुन आपल्या वृद्ध आजोबाचा निकाल उड- विण्याचे व स्वतः राज्य बळकविण्याचे स्वार्थी विचार त्याच्या मनांत घोळत होते, त्याप्रमाणे तो या स्वारीतून राजधानींत पाटण येथें परत आल्याबरोबर त्यानें आपल्या आजोबास- मुज्करशहास - केद केलें, आणि राज्यसूत्रे बळकावून तो गुजराथचा बादशहा बनला; परंतु आपल्या आजोबाचा हा कांटा जिवंत ठेवणें त्यास सुरक्षित वाटलें नाहीं; हणून त्याने विषाचा एक पेला तयार करवून तो मुञ्करशहास पिण्यास दिला; तरी अशा दुष्ट व निर्दय नातवाचे अभिष्टचिंतून" या ऐश्वयांचा तूं दीर्घकाळ उपभोग घे" असा त्यास आशिर्वाद देऊन त्यास कित्येक बोधाच्या गोष्टी सांगून व परमेश्वराजवळ " त्याचें कल्याण कर" असे मागणे मागून त्यान ते दोष प्राशन केलें ; ( ता० २७ जुलै ३० सन १४११ ) .