लागत असे, माणि तशांतही मुसलमानी फौजा विशेष अनियंत्रित व अविचारी असल्यामुळे तर तो परिणाम अधीकच प्रमाणानें दृग्गोचर होत असे; वरील विवेचनाव- रून मुज्करशहापर्यंतच्या राजकीय परिस्थितीची, तत्कालीन राजकीय भानगडींची, 'कोणासही योग्य कल्पना होईल.
तथापि मुज्फूरशहाच्या काळापासून राज्यपद्धतीस स्थैर्य येत गेलें; व त्या त्या प्रमाणानें प्रजेस शांतता व स्वस्थता यांचा लाभ होण्यास प्रारंभ झाला. मुज्फूरशहा गुजराथच्या सुभेदारीवर स्थानापन्न झाल्यानंतर रास्तीखानाबरोबरील युद्धांत ज्या- ठिकाणी तो विजयी झाला, त्याठिकाणीं त्यानें एक शहर वसविलें व त्यास आपल्या विजयाचें द्योतक ह्मणून " जीतपूर " हें नांव दिलें. मुज्करशहा हा मूळचा हिंदू होता; तरी सुद्धां हिंदूधर्माबद्दल त्याला बिलकुल सहानभूती नसून उलट त्या धर्माच त्याचा विशेष कटाक्ष होता; त्यामुळे त्यानें सोरटी सोमनाथाच्या देवळाचे दगड काढून ते मशीदीला लावले; हिंदूधर्माला विरुद्ध अशी अनेक कृत्यें करून त्या धर्मांची पायमल्ली केली व आपल्या सुलतानी सत्तेच्या रुळाखाली आसपासच्या हिंदू राज्यांचे प्रतिरोधक कांटे नामशेष करण्याच्या उद्योगास त्याने मोठ्या धडाक्याने सुरवात केली. पाटण मंडळगड, झालावाड वगैरे ठिकाणच्या राज्यकर्त्यांना त्यानें आपल्या कक्षेखालीं आणिलें. इराणचा शूर राणा रण- • मलजी याजबरोबर युद्ध करून ( इ० सन १३९३ मध्ये ) व त्यांत त्याचा पराभव करून, यातील सत्यतात्पुरतें कमी केलें. नंतर मुसलमान राज्यकर्त्यांवर त्याची दृष्टी गेली. त्यानें खानदेश व माळवा प्रांतांवर स्वारी करून तेथील राज्यकर्त्यांकडून खंडणी मिळविली; 'आणि यावेळेपासूनच निरनिराळ्या राजकीय स्थित्यंतरांचा त्याला अमोल्य फायदा मिळून तो गुजराथ प्रांताचा स्वतंत्र राज्यकर्ता बनला.
इ० सन १३९४ मध्ये दिल्ली येथील सुलतान महंमदशहा, हा मृत्यू पावल्यावर, हुमायून ऊर्फ शिकंदर व तो एकाएकी मृत्यू पावल्यावर महंमदशहाचा दुसरा मुलगा महेमूद हा गादीवर आला. या राज्यकर्त्याच्या कारकीर्दीत राज्यव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कळीत होऊन, निरनिराळ्या सरदारांनी निरनिराळ्या ठिकाणी आपआपले सवतेसुभे निर्माण केले; आणि (जोनपूर ) बंगाल, पंजाब, माळवा व खानदेश, यांच्याप्रमाणेच गुजराथमतिही स्वतंत्र झाला. ( इ० सन १३९६ ) आणि मुज्झरशहा गुजराथेंत त्या प्रांताचा पहिला राज्यकर्ता बनला.
मुज्करशहास तातारखान या नांवाचा एक मोठा शूर मुलगा असून तो दिल्ली स बादशहाचा वजीर होता; परंतु त्याचा प्रतिस्पर्धी मलिक इक्पाखान यानें त्यास स्थानभ्रष्ट केल्यामुळे, तो आपला मुलगा अहमदशहा, यासह गुजराथेत आपल्या बापाजवळ-मुज्फूर-