Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७५)

कामगिरी बजाविली; त्यामुळे दमाहीम आदिलशहाने खुष होऊन आपल्या मृत्यूपूर्वी बाबाजीस पाटडफच्या लिहिण्याप्रमाणें नागोजीस नव्हे- माणदेशची देशमुखी व "झुंजा- रराव " हा किताब दिला. " ह्या बाबाजी झुंझारराव घाटण्याची जी माहिती मिळते, तिच्यावरून ह्यास उदयास आणण्यास एक तपस्वी ब्राह्मण कारण झाला असें दिसतें, त्याचे नांव परशुराममट ( चिन वेदंभट ) असे होते. ह्यास बाबाजी ह्याने एकेदिवशीं विनंती केली कीं, " तुझी थोर तपस्वी आही. काहीं अनुष्ठान करून आमचें उर्जित होऊन माग्याची वृद्धि होयसारखें करावें. त्यावरून परशुरामभट ह्यांनी श्रीरामेश्वर प्रति खटाव येथे श्री जवळ अनुष्ठान केले, तेव्हा श्रीने साक्षात् प्रसन्न होऊन सांगितलें जे, 'विजापूरास जाऊन अंबरखान याची भेट घेणे. त्याचे हातून इब्राहीम जगद्गुरु पादशहास भेटवितील. दौलत अक्षयी होईल. चिंता नाहीं. " नंतर श्रीच्या अनुष्ठानाची सांगता करून बाबाजी घाटगे व परशुरामभट बुधास आले; व सुमुहूर्त पाहून स्वार होऊन विजापुरास गेले. तेथें हजरतीची मुलाजमत होऊन बाबाजी ह्यांचा दरबारांत प्रवेश झाला व त्यास सात लक्ष्य होनांची दौलत प्राप्त झाली. त्यांचे कुलगुरू श्रीपरशुरामभट हे त्याजबरोबर सदैव असत. ते त्यास संकटप्रसंगी वारंवार धीर देऊन व श्रींचा आशीर्वाद देऊन त्याचें कल्याण चिंतीत असत. या त्यांच्या उपकारास्तव बाबाजी झुंझारराव ह्यांनी स्यास मोजे सांबर्डे व मोजे रेठरें प्रति पन्हाळा हीं दोन गावें मुकासा करून दिलीं व त्यांस दिवटी व छत्री दिली. पुढे बाबाजी घाटगे लौकिक संपादन करून इ० सन १६४१ सालीं मृत्यु पावले. " त्यास दावजी व राजजी असे दोन मुलगे होते. त्यांपैकी दावजी यास शहाजी भोंसले याची मुलगी दिली होती. पुढे दावजीवर कांहीं कारणामुळे आदिलशहाची इतराजी झाली; ह्मणून शहाजीच्या वशिल्यानें त्यानें भागानगर ऊर्फ हैद्राबाद येथें जाऊन कुत्बशाहीन सरदारकी मिळविली व पुढे लवकरच तो तिकडेच मृत्यू पावला. त्यानंतर दावजीचा भाऊ राजजी हा पुन्हा विजापूर येथे गेला व अदि- लशहाची मर्जी संपादन करून त्याने आपल्या वडिलांची जहागिरी व झुंझारराव " हा किताब परत मिळविला. याच काळांत शिवाजीने राज्यसंस्थापनेचा उद्योग आरंभिला होता; परंतु त्यांत राजजी यानें त्यास कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. उलट तो अखेरपर्यंत शिवाजीविरुद्ध मोंगलांस चिकटून असून अफझलखानाने शिवाजीवर केलेल्या स्वारीत बिजापूरकरातर्फे तो शिवाजीश युद्ध करण्यास आला होता. पुढे अफझलखानाचा वध झाल्यानंतर ( ता. ७ नोव्हेंबर ६० सन १६५९ ) त्याच्या सैन्याचे व शिवाजीचे जे युद्ध झालें, त्यात तो, शिवाजीचा भावात मंबाजी भोसले व त्याचा भाचा नरसोजी सांगळे, या सर्वांनी भाग घेतला होता; परंतु