त्या सर्वोचा खानाच्या सैन्याबरोबरच पराभव होऊन शिवाजीनें त्यांना कैद करून वाईस नेलें व तेथें कांहीं दिवस ठेवून त्यानंतर त्यांची मुक्तता केली; आणि राजजी झुंजारराव यास अलम गुमान - घोडा व एक सरदार बक्षीस देऊन व मंबाजी भोंसले व नरसोजी सांगळे यांसही बक्षीस देऊन त्यांना परत जाण्यास निरोप दिला; परंतु त्यानंतरही लागलीच नरसोजी व झुंजारराव हे उभयतां सैन्य जमवून विजापूर येथें जाऊन, शहास भेटून पुन्हां आदिलशाही नौकरीत दाखल झाले व राजजी यानें लवकरच शहाची मर्जी संपादन करून घेतली; तेव्हां शहानें खूष होऊन राजजी यास, त्याचा बहुमान करून, कारवे, जेहाचें तासगांव, तुळजापूर व कोरेगांव प्रति वाई हे मोकासे मुकरर करून दिले; त्यानंतर इ० सन १६८० मध्ये शिवाजी मृत्यू पावला त्या वेळेपर्थेत राजजी हा त्याच्या विरुद्धच्या मोहिमा व खटपटी, यांमध्यें सारखा भाग घेत होता; राजजी ऊर्फ झुंझारराव हा शिवाजीच्या मृत्यूनंतर पुढे दोन वर्षांनी ३० सन १६८२ मध्ये मृत्यू पावली. त्यास सहा मुलगे होते; त्यांपैकी वडील, 'पदाजी हा दौलतीचा अधिकारी झाला व अदिलशाही दरबारांत चाकरी करून राहू लागला, परंतु पुढे अवरंगझेब दक्षिणेत आल्यावर आदि- लशाही नौकरी सोडून तो मोंगलांच्या आश्रयास गेला व अवरंगझेबाने त्यास कसबे मलवडी, खटाव व बुध वगैरे गांवाची देशमुखी, ठाणेदारी व फौजदारी दिली. पुढे या घाटगे घराण्याचा कुलोपाध्याय व तपस्वी पुरुष परशुरामभट यानें त्याचें मन वळवून त्यास मोंगलांच्या पक्षांतून फोडून मराठयांच्या गोटांत आणिलें व स्वतः चंदीस जाऊन राजाराम महाराजांस मदत करून पदाजी घाटगे याची कन्या मंबिकाबाई
टीप १: – राजजी ऊर्फ झुंझारराव व शहाजी राजे यांचा विशेष स्नेह असून ती गोष्ट शिवाजीस माहीत होती; ह्मणून त्यानें झुंझाररावास आपल्या पक्षांत व आपणाजवळ राहण्याविषयी पुष्कळ आग्रह केला; परंतु तो शिवाजीजवळ राहण्यास कबूल झाला नाहीं; तेव्हा त्याचा मोठा सन्मान करून शिवाजीनें त्यास परत जाण्यास निरोप दिला. ( भा० इ. सं. मंडळाच्या नवव्या संमेलनांत रा. ब. पारसनीस यांनीं, या झुंझाररावास शिवाजी महाराजानें लिहिलेल्या पत्राची चिटणिसांनी घेतलेली नक्कल वाचून दाखविली; त्यांत, " हे राज्य- कांतांचे दिवस...... आह्मी जाणूनबुजून तुझाला त्रास देऊं, ही कल्पना तुह्याला शिवली तरी कशी, हे मला समजत नाहीं " असा महत्वाचा मजकूर आहे.
शिवाजीनें या शूर व प्रसिद्ध सरदारास आपल्या पक्षाला मिळवून घेण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; परंतु तो निष्फळ झाला; इतकेंच नाही तर, आपल्या मृत्यूपर्यंत, आपल्या विरुद्ध सारख्या खटपटी करीत राहणारा, असा हा आपला एक जबरदस्त शत्रू आहे, असें शिवाजी- या सारखे पूर्णपणे अनुभवास येत गेलें ।