Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७४ )

"तुह्मी फलटणचे जहागिरीचा हक्क सोडून था, आह्मी तुह्यास मोठें राज्य देऊ व तुमचे हातून महत्कार्य होणार आहे. याजकरितां वर्णगोजी नाईक याजला अधिकारी गादीचे करण्यास परवानगी यांची. " यापमाणे महादजीने पलटणच्या जहागिरीचा हक्क सोडिला व वणगोजा नाईक तिचा अधिकारी झाला. त्यानंतर महादजी हा शिवाजीबरोबर नेहमीं स्वान्यामध्ये हजर असे व त्यानें महाराष्ट्र-राज्यसंस्थापनेच्या कामी शिवाजीस उत्तम साह्य केलें. पुढें अवरंगझेबाने संभाजीचा वध केल्यानंतर स्थानें अनेक मराठे सरदार पाडाव करण्याचा प्रयत्न केला; त्यांत महादजी त्याच्या हात सांपडला; तो शिवाजीचा जावई ह्मणून अवरंगझेयानें त्यास त्याची पत्नी सखूबाई हिजसह वाल्हेर येथील किल्ल्यां प्रतिबंधात ठेविलें तेथेंच तो पुढे मृत्यू पावला व त्याची पत्नी सखूबाई ही त्याजबरोबर सती गेली. महादजीस औरस संतति नव्हती. " महादजी यांचे राखीचे पुत्र ( दासीपुत्र ) भाजी बाजी हैद्राबादेत राहिले होते. त्यांस पुत्र जानोजी व त्यांचे पुत्र रावरंभा हे पुढे राजाराम महाराज यांजकडे गेले. (त्यांना शाहूनें पांच हजार स्वारांची मनसच करून दिली होती. ) पुढे बाळाजी विश्वनाथ ( बाजीराव ) यांचे व त्यांचे बनेना; सबव तेथून ते निघोन हैद्राबादेस गेले. तेथें सरदार जाले. त्यांनी मोठा लौकिक मिळवून पन्नास लक्षाची जहागीर मिळविली. " हेद्राचादेस " रावरंभा " हे सरदार घराणें अद्यापि अस्ति स्वांत व प्रसिद्ध आहे; त्याप्रमाणेच फलटणच्या जहागिरीचा अधिपती वणगोजी नाईक इ. सन १६९३ मध्ये मृत्यू पावला. त्यावेळेपासून ही जहागीर वंशपरंपरे चालत आली असून ती आजतागायत अस्तित्वात आहे.

 २ मलवडीकर घाटगे: - घराणे पहिल्याने निजामशाहीत व नंतर आदि- लशाहीत प्रसिद्धीस आले असून निजामशाही हकीकतीमध्यें त्यासंबंधी लोहोनाक घाटगे याच्या काळापर्यंतची हकीकत दिलेली आहे. या लोहनाकास कडतोजी या नांवाचा एक मुलगा असून त्यास चायाजी व बाळोजी असें दोन मुलगे होते. हे उमताही पराक्रमी असून त्यातल्यात्यात बाबाजी हा विशेषच शूर व लौकिकचान् निपजला. या उभय- तांनाही निजामशहाकडून "बाजी " हा किताब मिळाला होता, या उभयतां धूपैकों बाळोजी यास मालोजी भोसल्याचा मेहुणा वर्णगोजी निंबाळकर यानें आपली कन्या जानाई ही दिली होती; व हाच पुरुष पुढं विजापूर दरबारांत नोकरीस राहून एक प्रमुख व प्रसिद्ध मराठा सरदार बनला होता, परंतु त्याचे वाढते वर्चस्व मुसलमान सरदारमंड- ळीस सहन न होऊन वजीर याकुत सर्जा यानें त्यास मेजवानीस बोलावून दग्पाने ठार मारिलें. त्यास सात मुलगे होते; त्यांपकी बाबाजी व मिटोजी हे पुढे विजापूर दरबारति महत्वाचे सरदार हाणून प्रसिद्धीस आले व त्यांनी अनेकवेळा विजापूर दरबारची महत्वाची