जहागीर वतन देण्याचा ठराव करून ( मुधोजी नाईकानें ) विजापूरचे बादशहाचा हुकूम आणिला. " परंतु ह्या व्यवस्थेस त्याचे जगदेव व साबाजी हे दोन्ही वडील मुलगे कबूल नव्हते; ह्मणून मुधोजीचें व या उभयता दोन्हीं वडील मुलांचं वकिंड येऊन त्यांनी मुधोजी- विरुद्ध विजापूरकराची मदत मिळविली; च ते मुधोजीवर चाल करून येऊन शिरवळ नजीक भोळी या गांवीं उभयतांमध्ये लढाई झाली; तींत मुधोजी हा एका वडाच्या झाडाखाली आपल्या एका पुत्राच्याच हातून मारला गेला, ( इ० सन १६४४ ) या चडाला बापमारीचा वड" असें ह्मणतात. या युद्धानंतर " बजाजीराव ( सईबाईचा भाऊ व छत्रपती संभाजीचा मामा ) यांस धरून विजापुरीं बादशहाकडे नेलें, त्यासमयीं त्याची खो गरोदर होती. ती गुप्तरूपाने आपले माहेरी गेली व तेथें प्रसूत जाली. पुत्र जाहला, त्याचें नांव महादाजी नाईक ठेविलें. बादशहाने फलटण जहागीर जप्त केली ते समयीं राजाळकर निंबाळकर यांणी बादशाहापासून पलटण प्रांताची देशमुखी आपले तनख्यांत मागून घेऊन सनद घेतली. नाईकास ( बजाजीरावास ) बापाचे अपराधाबद्दल जिवे मारण्याची आज्ञा जाली. पुढें बादशहाचे सरदार माने, घाटगे, घोरपडे आदिकरून व काळोजी शिंदे ताथवडेकर यांणों विनंती करून मारण्याचा हुकूम रहित करून, मुसलमानी धर्म स्वीकारून, बादशहाची मुलगी बेगम हिच्याशीं बादशहानें लम लाऊन, आपलेपाश कांहीं दिवस ठेवून घेऊन, पुढे बेगमचे वतीने ( बजाजी ) नाईकांनी फलटणचा अंमल आपलेकडे घेऊन, बादशहाचा फर्मान घेऊन, फलटणांत सन सोळाशें एकावन्नांत येण्यास निघाले. पुढे महादेवीं येऊन शुद्ध जाले. नंतर फलटणों आल्यावर बेगम हक्क जाहल्याचे ( मृत्यू पावल्याचें) समजलें. तेव्हा ( बजाजीराव ) नाईकास दुःख जालें. पुढें फलटण प्रांताची लागण केली. " बजाजी नाईकास शिवाजीची आई जिजाबाई हिनें शंभू- महादेवाचे देवळांत प्रायश्चित देऊन परत जातींत घेतलें व त्याचा मुलगा महादजी याचें लम शिवाजीची मुलगी सखुबाई हिजबरोबर करून दिलें. त्यानंतर महादजी नाईक हा आपले कुटुंब सखूबाई हिजसह आपला कुलस्वामी जेजुरी येथील श्रीखंडेराव याच्या दर्शनास गेला; " वाटेंत वाल्हे गांव लागला. तो पाहून महादजी नाईक बोलले कीं, हा गांव चांगला आहे. आपल्यास मिळेल तर बरे होईल. त्यावर पुढें दिपवाळींचे ओवाळणी- बद्दल सखुबाईनीं शिवाजीराजे भोसले यांजकडून तो मागून घेतला. " ( इ० सन १६५७ ) સો याच सुमारास बजाजीराव मृत्यू पावला; त्याची घुमटाची समाधी आजतागायत फलटण येथे अस्तित्व आहे.
बजाजीस महादजी, मुधोजी व वणगोजी असे तीन पुत्र होते. त्यां शिवाजीचा जांवई महादजी नाईक यास " ( शिवाजी ) महाराजांनी सांगितलें कीं,