राज्याचे गाडे हांकीन, आपल्या पूर्वजांप्रमाणे तक्ताचा उपभोग घेईन, आपले आयुष्य मोठ्या चैनीत घालवीन, असें करीन तसें करीन वगेरे आशा होती त्याच इतभाग्यास भर अठरावीचे सुमारास कारागृहवास भोगावा लागला । व शेवटीं दुसन्याच्या आज्ञेने स्वहस्तें पी खाऊन मरावें लागलें ।
"असो. अशाप्रकारे शिकंदर हा अवरक्षेवाचे स्वाधीन झाल्या दिवसापासून आदिलशाहीचा सूर्य मावळला तो मावळलाच ! व विजापूर या नांवाचा एवढा दरोरा, एवढी थोरवी, एवढा लौकिक होता तेच विजापूर तेव्हापासून हा काळपर्यंत सादीस पडून मयाण व उदास बनून राहिलें आहे ।!
हिंदुस्थानांतील इतर अनेक मुसलमान राज्यकर्त्यांप्रमाणेच आदिलशाही सुल- ताननिही अनेक प्रेक्षणीय इमारती, मशीदी, महाल, घुमट वगेरे बांधकामे केलेली आहेत; आणि त्यातील काही तर अपूर्व अशीच आहेत. त्यांपैकी " विजापूर येथील बोलघुमज " एवढा घुमज सर्व जगांत दुसरा वचितच आढळेल. मि. जेम्स डगलस यानें आपल्या Book of Bombay या पुस्तकति याविषयीं असें लिहिले आहे की, " ह्या घुमजाचा व्यास १३० फूट आहे; त्यामुळे तो रोम येथील " पॅथियन " आणि लंडन येथील " "सेंटपाल " ह्या इमारतींच्या घुमजापेक्षा मोठा आणि " सेंटपिटर्स" पेक्षा अगदी किंचित् कमी आहे. " विजापूर येथील प्रसिद्ध बादशहा सुलतान महंमद ( इ० सन १५२६ ते ३० सन १५५६ ) यानें आपल्या कारकीर्दीमध्ये विजापूर येथें हा अपूर्व मकबरा बांधला. ह्या इमारतीची हमचोरस प्रत्येक बाहेरील चौथन्याची लांबी १९८ फूट व रुंदी तळमजला सोडून कळसापर्यंत २२३ फूट आहे. चोहोबाजूस चार अष्टपैलू मनोरे मनोन्यांच्या सहाश्या मजल्यास लागून इमारतीच्या सभोवती गच्ची, असा ह्या इमारतीचा बाप देखावा आहे. या इमारतीच्या आंत जाण्यास तीन दरवाजे असून हल दक्षिणेच्या बाजूचा दरवाजा खुला आहे. त्यांतून अति गेल्यावर घुमजाची १३५ फूट इमचौरस खोली आहे; व तिच्या मध्यभागी ७६ मचौरस फूटांचा एक चौथरा असून याच्याच मध्यमार्गी सुलतान महंमद याची मोठी प्रेक्षणीय कबर आहे व त्यांवर हमचोरस १४ फुटांचे लांकडी सुंदर मसर आहे. इमारतीस चोहोबाजूस असलेल्या चारी अष्टरेलू मनोन्यांना आठ मजले आहेत व कचरीच्या खोलीच्या चारी कोपन्याचे भिंतींतून र जाण्यास चार मार्ग असून त्यांपैकी नैऋत्येकडील मार्ग हल्ली खुला आहे. साच्या दरवाजाची उंची सहा फूट असून रुंदी पावणेतीन फूट आहे; व रस्ता सव्वा दोन फूट रुंदीचा असून तो मितीत दोन चौरसफुटांच्या दगडी खांबांस वळसा घालून वर वर निमुळता होत गेला आहे; व त्याची शेवटच्या मजल्यापर्यंत एकंदर उंची १०० फूट आहे. या