दिसे. जागजागी गुढया उमारिलेल्या व तोरणें बांधिलेलीं असत. शहरांतील सर्व मार्गावर चंदनाचे व कुंकुमाचे सडे घालीत व त्यांवर चित्रविचित्र रांगोळ्या काढ- लेल्या असत. शहरभर चिराकदान करीत व नगरवासी लिया उत्तम वस्त्रालंकार लेवून पंचारती घेऊन आपापल्या वाड्याच्या दुमजल्या तिमजल्यावर उभ्या असत व स्वारीचा थाट व शोभा डोळे भरून पाहण्याकरितां मार्गावर सर्व आबालवृद्ध प्रजा टोटली असे. बादशाहाची स्वारी ज्या ज्या मार्गावरून जाई त्या त्या मार्गावर नाग- रीक लोक जयजयकारप्रदर्शक सोन्यारूण्याचीं फुलें उधळीत त्यानेच सर्व रस्ता भरून जात असे. नंतर बादशहाची स्वारी आर किल्ल्यांत परत शिरतांच सलामीच्या तोफांच्या आवाजाने सर्व शहर दणाणून जाई; परंतु हल्लीं त्याच आदिलशाही राजधानीत सर्व शहर- भर मोगल सैन्य पसरलेले असून तिचा स्वामी जो बादशाहा शिकंदर आदिलशाहा तो कोठेच दृष्टीस पडेना; यामुळे ज्या राजधानीत पूर्वी मोठ्या आनंदानें उत्सव व्हाव याचा तेथे सर्वत्र आक्रोश व हाहा:कार यांनी ग्रस्त करून सोडिलें होतें. ज्या रस्त्यावर पूर्वी चंदनाचे कुंकुनाचे सडे घालीत असत तेथे रक्ताचा सडा पडला होता; व जागो- जाग योट्र्यांचीं छिन्नविछिन्न झालेली शिरें पडलेली असून त्यांवरून अवरंगझेबाचा असंख्य सैन्यभार पर्वा न करितां तुडवीत चालला होता. अवरंगझेबाचे लोकांनी क्रोधानें शहरांतील मोठमोठे वाडे जमिनदोस्त करून टाकिले व मनमानेल ती अनन्वित कृत्ये केली.
"यानंतर अवरंच एक वर्षपर्यंत शहराबाहेर खुशाल आनंदमम राहून आदिल- शाही घराण्याचा खजिना व असंख्य मौल्यवान् उंची जवाहीर यांची उंटच्या उदें भरून घेऊन दिल्लीस चालता झाला. हे असें करण्याचे त्याच्या मनांत नव्हते, पण ह्यावेळी ( इ० सन १६८९ साली ) पटकीचा आजार सुरू होऊन एक लक्ष लोक मृत्यूच्या तोंडी पडले. ह्या भीतीनें त्यानें शहर सोडिलें.
" इकडे शिकंदर हा अवरंगझेबाच्या स्वाधीन झाल्यापासून त्याने त्यास औरं गाबाद येथें कैदेत ठेविलें होतें व तेथें तो पुढे चौदा वर्षे कैदेत होता. नंतर ३० सन १७०० ह्यावर्षी (इ० सन १७०१ ह्यावर्षी असाही उल्लेख आढळतो) अवरंगझे- खरबुजांतून त्यास चोष पाठविलें; व " तुझी काय इच्छा आहे " ह्मणून त्यास विचारिलें, तेव्हां ह्यांतील हेतू त्याच्या डोळ्यापुढे उभा राहून त्यानें " माझें शव विजापूर येथें पाले बाजारांत माझा गुरू शहानदी मुल्ला याची कबर आहे त्याच्या पायापाशीं गाडावें " 'असे सांगून ते सरबूज खाऊन प्राण सोडला !!" त्यानंतर त्याच्या इच्छेप्रमाणे पाले- बाजारात त्याच्या गुरूच्या पायापाशीं त्याच्या शवाचें दफन करण्यांत आलें.
हाय हाय ! ज्या पराक्रमी पुरुषानें आदिलशाहीचें तक स्थापिलें त्याच्या तकाचा व विशेषतः वंशवृक्षाचा अशाप्रकारें शेवट व्हावा काय ? ज्या शिकंदरास मी