रस्त्यास दूर तीन पायऱ्या नंतर कळवा असून प्रत्येक वळणाच्या ठिकाणी भिंतीत छिद्रे पाडून उजेड केला आहे. चोवीस चोबीस पायन्या चढल्यावर कोपन्यांतील मनोन्याच्या मजल्यावर एक बाजूस जाण्यास मार्ग लागतो. त्या एकेका मार्गाने एकेका मजल्यावर जातां येतें, प्रत्येक मजल्याचा व्यास बत्तीस फुटांचा असून त्याची उंची सोळा फूट आहे. झाच मार्गाने पुन्हा परत येऊन मुख्य रस्त्यास मिळावें लागतें व याचप्रमाणे आदी मजल्यांवर जावें लागतें. ह्या प्रत्येक सनोन्यावर एक एक घुमज असून सहाव्या मजल्यावर गेलें असतां मुख्य इमारतीच्या सभोवती असलेली गच्ची लागते. तिच्या प्रत्येक बाजूची लांबी १४० फूट असून रुंदी २ फूट १० इंच व उंची ८ फूट ८ इंच आहे व पा गच्चीवर भरपूर हवा व उजेड रहावा ह्मणून तिला साडेतीन फूट रुंदीच्या अशा एकूाँस कमानी केलेल्या आहेत, यावरून सुलतान महंमदांची कबर पाहण्याकरितां छिद्र ठेविलेलें आहे व गचीवरून वरील घुमटाच्या पायथ्यापाशीं जाण्याकरितां प्रत्येक बाजूस दोन दोन मार्ग केलेले आहेत; त्याप्रमाणेच मनोन्याच्या सातव्या मजल्यावरील गच्चीवर आणखी एक कडील फूट रुंदीची पोगची केलेली आहे; परंतु तीत अशी खुची आहे की, ही गची भिंतींत असल्यामुळे बाहेरून पाहणारास तेथे अशी पोटगच्ची असावी अशी कल्पनासुद्धां होत नाहीं, तिलाही हवा व उजेड याकरिता अजमासे तीन तीन फुटांची छिद्रे ठेविलेली आहेत; पण ही इमारतच इतकी उंच आहे की, खालून पाहणारास हीं छिड़ें अतीशयच लहान दिसतात.
ह्या जगबाळ घुमटाची जाडी बास फूट असून आत गेल्यावर एक अकरा फुटाची गची लागते; पण यादि ठिकाणी अशी मौज आहे की, सुलतान महंमदाच्या कचरेजवळ उभे राहिले असता ही गच्ची मुळींच दिसत नाहीं; याठिकाणी जाण्यास आठ मार्ग असून त्यांची रुंदी अडीच व उंची सहा फूट आहे. दुरून हे रस्ते एखाद्या लहान छिद्राप्रमाणे दिसतात. ह्या गच्चीवरून खालीं कचरेकडे पाहिले असतां डोळे फिरून जातात. या गच्चीवर चिनआधारी साठ फुटांचा अत्यंत भव्य घुमज ( अथवा घुमट ) असून त्याचा ध्यास १३५ फूट व गच्चीचा घेर सुमारे ४०० फुटांचा आहे. ह्याठिकाणी एक शद्व उच्चारिल्याबरोबर त्याचा प्रतिध्वनी निदान दहावेळा निघतो; परंतु तो गायनयुक्त असून हळू हळू नाहींसा होतो. त्यामुळे मनुष्यास पहिल्यानें भीति उत्पन्न होते. याच ठिकाणी दुसरा आणखी एक असा विलक्षण व आश्यर्यचकित करून टाकणारा चमत्कार आहे की, दोन जणांनी भिंतीच्या दोन टोकास समोरासमोर बसून त्यांपैकी एकानें भिंतीस तोंड लावून अगदीं हळू बोलावे व दुसऱ्यानें भिंतांस कान लावून तें ऐकावें, ह्मणजे जरी या दोन टोकांन] १३० फुटांचें अंतर आहे तरी सुद्धां तो मनुष्य जसा कांहीं प्रत्यक्ष
२१