सहवर्तमान राहून, अनेकप्रकारची माहिती करून ध्यावी. चवथे मासापासून साहावे तासापर्यंत उघड़ दरबारति बसून, थोर, कारभारी, संभावीत व शिपाई लोक यांचा मुजरा ध्यावा. त्यावेळी सर्वास येण्यास मोकळीक असावी. गैररायता नसावा.
६४ सातवे तासापासून नववे तासापर्यंत एकांतांतील कामे असतील ती करावी.
६५ नषवे तासापासून एक प्रहर रात्रपर्यंतही एकाली बसून राज्यकारभारासंबंधी कामे करावी, ( अवशीचे पांच पटका रात्रीनंतर नमाज पढावी. ) ईशाम पडल्यानंतर हर पाहिजे तें काम करण्यास प्रादशाहा मुखत्यार आहे. या कायद्याप्रमाणे वेळ पाळवावी. शिरस्ता सोडून एक घटकाही बागूं नये. यावरून महंमद आदिलशहाची योग्यता व प्रजा- दक्षता निदर्शनास येते. हा शहा आपल्या वयाच्या १७ व्या वर्षी तीस वर्षे राज्य करून, इ. सन १६५६ मध्ये ( ता. ४ नोव्हेंबर रोजी ) मृत्यू पावला व त्याचा मुलगा अली आदिलशहा हा गादीवर आला.
शहाजहान बादशहाच्या काळांत दक्षिणेंत मोंगलांचे चार सुभे होते, इ. सन १६४४ मध्ये अवरंगझेबाने दक्षिणेचा कारभार सोडल्यावर ३० सन १६५२ पर्यंत दक्षिणेत अनेक मोगल सुभेदारांनी कारभार केल्यानंतर ३० सन १६५३ मध्ये अवरंगझेब का पुन्हा दक्षिणप्रांताच्या सुभेदारीवर आला; पुढें महंमद आदिलशहा मृत्यू पावून त्याचा मुलगा अटी दुसरा, हा गादीवर आला; त्यावेळी आपल्या परवानगीशिवाय तो गादीवर आला, या सबबीवर अवरंगझेबाने विजापूरला वेढा दिला; आणि तें शहर त्याच वेळेस मोंगलांच्या ताब्यात जाण्याचा रंग दिसूं लागला; परंतु इतक्यातच शहाजहान आजारी पडल्यानें स्वास परत येण्याविषयीं निकडीचें बोलावणे आल्यावरून तो दिल्ली येथे गेला, आणि यावेळी आदिलशाही राज्य या माणांतिक संकटांतून निभावलें.
तथापि आदिलशाहीचा शत्रू शिवाजी हा दिवसेंदिवस बळावत चालला होता; झणून विजापूरकरांनी अफूसलखान या नांवाच्या सरदारास त्याच्यावर पाठविलें; ( इ० सन १६५९ सप्टेंबर) परंतु तो ठार मारला गेल्यावर आदिलशहानें रुरतमुज्जमान यास शिवाजीवर पाठविलें; तथापि शिवाजीनें त्याचाही पराभव करून त्यास कृष्णानदी- पलीकडे इकिलून लावले; तेव्हां अदिलशहानें कर्नाटकमधील कर्नूलचा सुभेदार मलिक रयसान याचा आश्रित व तो मेल्यानंतर त्याच्या मुलास बाजूस सारून कर्नूलचा कारभार चळकावून बसलेला सरदार- सिदीजोहर यास त्यास सलाबतजंग असा किताब देऊन शिवाजीवर पाठविलें व त्याच्याबरोबर अफझलखानाचा मुलगा फाजल महंमद याचीही रवानगी केली; परंतु तो आंतून शिवाजीस सामील असल्यामुळे ही स्वाराही निष्फळ