झाली; तेही शहाने शिवाजीवर स्वतः स्वारी केली व पन्हाळा किल्ल्यास वेढा घालून स्वामें तो हस्तगत करून घेतला; परंतु शिवाजी तेथूनही निसटून गेल्याने शहाच्या खटाटोपाचा कोणताही उपयोग न होतां त्यास शिवाजीचा नाद सोडून विजापूर येथें परम येणे भाग पडलें.
पुढे शहाने सिदीजोहरचें व मेदनुरकर भद्राप्पा नाईक यांचे बंड मोडल्यावर, शिवाजीचे वाढते वर्चस्व मोडून टाकण्याकरितां मोंपल व आदिलशहा यांच्यामध्ये तद होऊन उभयतांनी मिळून शिवाजीवर स्वारी करावी, असे ठरले त्याप्रमाणे अवरंग-
याने राजा जयसिंह यास मोठ्या सैन्यानिशीं दक्षिणेत रवाना केलें व आदिलशाही सरदार सवासखान हादी आपल्या सैन्यासह मोगल सैन्यास मिळण्यास रवाना झाला; परंतु हीं उभयता सैन्ये एकत्र होण्यापूर्वीच विजापूरकराच्या सैन्याबरोबर एक जोराची चकमक उडवून शिवाजी पुरंदर किल्याकडे निघून गेला. इतक्यांत जयसिंह आल्यावर स्वास शिवाजी पुरंदरच्या किल्ल्यांत आहे असे कळले; त्याचरोबर त्यानें त्या किल्ल्यास ar दिला asat मोगलाच्या सैन्याबरोबर आपला निभाव लागणार नाहीं असें पाहून भ्यानें " आदिलशाही राज्य व दक्षिणदेश जिंकण्यांत मी मोंगलांना मदत करीन; असा जयसिंहास निरोप पाठविला जयसिंहास शिवाजीचे हैं झणणे मान्य झालें व त्याने लागलींच पुरंदरचा वेढा उठवून आदिलशाही प्रदेश लुटण्यास सुरवात केली; तेव्हां अर्थातच मोगलांच्या या वचनभंगाबद्दल विजापूरकरास आश्चर्य वाटलें व रागही त्यांनी जयसिंहाशी युद्ध करण्याची मोठी जंगी व जोराची तयारी केली, त्याचा दोनदा पराभव केला; त्याच्या मदतीस आलेला सरदार सलाबतखान याची अदिलशाही सरदार सजखान याने धुळधाण उडविली, पुढे कुत्बशाही सैन्य मदतीस आल्यावर त्यांनी कबाड मारून रसद गल्ला लूटून, जयसिंहाच्या सैन्याची अन्नान्नदशा केली, एका युद्धप्रसंगत तो स्वतः मरता मरता वाचला व अखेरीस अदिलशाहीचा नाद सोडून आपला जीव घेऊन दिल्लीकडे पळून जाणे त्यास भाग पडलें; अशारीतीने या "बेळी अदिलशाही मोंगलांच्या तडाक्यांतून जिवंत राहिली; परंतु अलीशहाच्या मृत्यू- नंतर चौदा वर्षांनीच ती नामशेष होऊन गेली.
हा शहा इ० सन १६७२ यध्यें मृत्यू पावला तो विषय होता तरी सुद्धा पराक्रमी, प्रजादक्ष व योग्य दाब व नियंत्रण ठेवणारा होता. तो स्वतः कवी होता, 'विद्वान् होता व विद्वानांचा आश्रयदाता होता; या शहाच्या कारकीर्दीत धर्माजी पंडित 'वगैरे हुषार ब्राह्मण – दक्षिणी व मराठे मंडळी - प्रसिद्धीस येऊन महत्वास चढली. अलीशहाच्या मृत्यूनंतर त्याचा अज्ञान पांच वर्षांचा मुलगा शिकंदर हा 'गादीवर आला.