अनेक किल्ले हस्तगत करून घेतले; आणि कल्याण प्रांताच्या सुभेदारास कैद करून तो सर्व प्रतिही हस्तगत करून घेतला; या सर्व गोष्टींमुळे विजापूर दरबारांत मोठी खळबळ उडून गेली; शिवाय रणदुल्लाखान कर्नाटकमधून परत आल्यावर शहाजीनें तिकडे आपलें वर्चस्व अतिशय वाढविल्यामुळे ते नष्ट करण्याची शहास इच्छा होतीच; त्यतिही "शिवाजीने चालविलेली धामधूम, या गोष्टीची भर पडली; आणि मुस्तफाखान व शहाजी यांच्यामध्यें वैरभाव उत्पन्न झाल्यामुळे तर हे प्रकरण विकोपासच गेलें; " शिवा- जीस शहाजीची फूस आहे, " या सचचीर शहाने शहाजी यास बाजी घोरपड्यामार्फत कर्नाटकांत पकडवून विजापूर येथे आणून प्रतिबंधांत ठेविलें; त्यावेळी शिवाजीनें शहाजहान 'बादशहाचा आश्रय घेतला; आदिलशहास मोंगली दरबारचा "काट - शह" देऊन आदिलशाही शांत अडकलेले शहाजीचें मोहरें त्यानें सुरक्षितपणे त्यांतून काढून घेतलें; आणि ६० सन १५५३ च्या प्रारंभी शहाजी पुन्हां कर्नाटकांत परत गेला.
महमद आदिलशहा हा विलासी होता, तरी तो मीठा सदाचरणी, पापभीरू, साधा व प्रजादक्ष होता. त्याने राज्यकारभार चालविण्यासंबंधी ८२ कलमांचे एक नियमपत्रक तयार केलें होतें; आणि त्यांतील कांही नियम तर अतीशय महत्वाचे व अनुकरणीय असेच होते व अहित; ह्मणून त्यांतील अगदोंच थोड़े नियम याठिकाणीं प्रथित केले आहेत, ते येणेंप्रमाणे:-
१" पादशहांनी इनसाफ करणे, हीच आपली अलंकार-भूषणे आहेत असें समजून, सर्व मित न्याय करण्याचे कामों खर्च करावी. असें सांगितले आहे कीं, संपूर्ण आयुष्यात एक घटका न्याय करणें हैं, पादशहास शंभर वर्षे वैराग्य धारण करून ईश्वरसेवा करण्यापेक्षा अधिक पुण्यकारक आहे. " पादशहांनी खुद्द जातीने मुलुकाची महामुरी व "रयतेची आबादानी ठेवून, न्याय करण्याचे काम अंतर पडूं देऊं नये. कारण, मुलकाची आबादानी है, राज्याच्या बंदोबस्ताचें व खजिन्याच्या आबादानांचें कारण आहे......"
६" रयतेस पूर्ण सुखी ठेवून बहुत रूपनें व दयाळूपणानें तिचे पालन करावें. "
११ 'असत्यवादी, येमान, बदचालीचे, कुटिल, गर्विष्ठ, फंदफितूर करणारे ह्यांस सरकारी कामांत घेऊं नये व सरकारवाड्यांत येऊ देऊ नये. हे कोणत्याही भरवशाच्या कामास उपयोगी नाहीत. "
१२ चुगलखोर मनुष्याच्या बोलण्यावर भरवसा ठेवू नये व त्याजवर क्रोधही करूं नये. कधीं त्याचे सांगण्यांत खरेपणाही असतो.
६३ बादशहांनी कोणत्याही कारभारांत अफरातफर होऊं देऊ नये. दिवसाच्या वेळाचे तीन विभाग करावे. प्रातःकाळपासून तीन तासापर्यंत विद्वान्, गुणवान व कवी