त्या किल्ल्यांत निजामशाही घराण्यांतील मूर्तिजा या नांवाचा एक राजपुत्र प्रतिबंधांत होता, न्यास तेथून मुक्त करून शहागड ऊर्फ भीमगड येथें आणून तक्कावर बसविलें; ( इ० सन १६३३ जुलै.) आणि जुन्नर हे शहर निजामशाही राज्याच्या राजधानीचे ठिकाण करावें, असा त्यानें बेत केला. यावेळी जुन्नर येथें त्याचा स्नेही असलेला श्रीनिवासराव हाच सुभेदार होता. त्यास शहाजीनें, शहास राहण्याकरिता जुन्नरचा किल्ला, त्याच्या आसपासच्या प्रदेशासह आपल्या ताब्यात देण्याविषयीं विनंती केली; परंतु श्रीनिवासरावानें शहाजीचें हैं झणणे मान्य केलें नाहीं, तेव्हा अखेर नाइलाजानें शहाजीनें त्यास कैद केलें ; त्याची मालमिळकत जप्त केली; आणि जुन्नरचा किल्ला व आसपासचा प्रदेश- शहाजीच्या ताब्यांत येऊन शहा जुन्नर येथें येऊन राहूं लागला. शहाजीच्या या धडाडीच्या रुत्यामुळे त्याचें वजन अतीशय वाढले व निजामशाहीची पांगलेली बारा तेरा हजार फौज त्यास येऊन मिळून तो लवकरच पुष्कळच बलाढ्य बनला.
इकडे आदिलशाहीत खवासखान व मुरारराव यांचे वर्चस्व इतकें परमावधीस गेलें की, या उभयतां डोईजड व्यक्तीविषयी, शहा हा आतां वयांत आलेला असल्यामुळे, त्यास अतिशय वैषम्य वाटू लागले; इतक्यांत खवासखानाने शहाजहान बादशहास विजापूरवर स्वारी करण्यास बोलाविले; ही हकीकत शहास कळल्यावर त्याने लागलीच खवासखान व मुरारराव यांचा वध करविला; तथापि खवासखानाच्या आमंत्रणाचा शहाजहानने लागलीच फायदा घेतला, आणि इ० सन १५३५ मध्ये स्वतः दक्षिणेत येऊन त्यानें आपला सरदार खानडोरान• यास विजापूरवर पाठविलें, त्याप्रमाणें तो त्या शहरावर चाल करून येण्यास निघाला; परंतु महंमद आदिलशहाने विजापूरसभोवतालचा दहा बारा मैलांचा प्रदेश ओसाड करून टाकिल्यामुळे त्याने राजधानीकडे जाण्याचें तहकूब करून तो अदिलशाही प्रदेशांत लुटालूट करूं लागला, पुढे शहाजहान याने शहाजीस व निजामशाही पक्षांतून महंमद आदिलशाहास फोडून आपल्या पक्षाकडे ओढून घेतलें; व इ० सन १६३६ या मे महिन्यांत विजापूरकराचा व मोंगलाचा तह झाला; त्याअन्वयें, पुणे, सुर्पे, इंदापूर, रामती, चाकण हे शहाजीच्या जहागिरीचे परगणे सिंहगड, पुरंदर, लोहगड व माहुली हे किले, व दाभोळपासून वसईपर्यतचा सर्व कोकणप्रांत, असा निजामशाही राज्यापैकी ऐशी लक्ष रुपये उत्पन्नाचा प्रदेश विजापूरकरास मिळाला. बाकी प्रदेश शहाजहान यार्ने मोगली राज्यांत सामील केला व शहाजी यास, महंमद आदिलशहाने शहाजहानच्या परवानगीनें आपल्या नोकरीत ठेवून घेतलें. ( इ० सन १६३७. )
त्यानंतर ३० सन १६४६ मध्ये शहाजी कर्नाटकच्या कामगिरीवर गेला. इतक्यात इकडे त्याचा मुलगा शिवाजी यानें आदिलशाही राज्यांतील पाटमाथ्यावरील