व्यास खवासखान " ही पदवी देऊन; त्यास विजापूरचा सुभेदार नेमिलें व आपला दुसरा मुलगा महंमद यास राज्यावर बसवून, त्याचा सांभाळ करून, राज्यकारभार चालविण्याची कामगिरी त्यास सोपविली. त्यामुळे महंमदशहाच्या कारकीर्दीत खवासखान हाच सर्व राज्याचा सूत्रचालक बनला. या सवासखानाचा कारभारी व त्याच्या अतीशय विश्वासतिलि प्रेमातील मुरारराव- मुरारपंत अथवा मुरारजगदेव, किंवा " यानतराव " या नांवाचा एक ब्राह्मण असून तो मूळ सातारा जिल्ह्यांतील कोरेगांव नजीकचें नागरगांव ऊर्फ तुळापूर येथील कुळकर्णी होता, मुरारपंत हा मोठा शूर व कर्तबगार मनुष्य असून कोणत्याही स्वारीवर अदिलशाही सैन्य निघालें तरी सैन्याचा मुख्य अधिकार खवासखान हा त्याच्याकडेच सोपवीत असे आणि खवासखानाने राजधानीत राहून राज्यकारभार सांभाळावा व मुरारपंतानें बाह्यप्रदेशी मोहिमा कराव्या, असा क्रम अनेक वर्षे चालू होता.
निजामशाहीचा ज्ञाता प्रसिद्ध मलिकंबर हा ज्या वर्षी मृत्यू पावला, त्याच वर्षी- झणजे इ० सन १६२६ मध्ये विजापूरकर इवाहीम अदिलशहा हा मृत्यू पावला; आणि त्याचा अल्पवयी मुलगा महंमद हा गादीवर आला. त्यानंतर एक वर्षांतच जहागीर बादशहा मृत्यू पावला ( ता० २८ आक्टोबर ३० सन १६२७. ) आणि त्याचा गादीवर आलेला मुलगा शहाजहान यानें निजमशाही राज्य नेस्तनाबूद करण्याचा अट्टाहास सुरू केला; तेव्हा मूर्तजा निजामशहाने महंमद अदिलशहाची मदत मागितली; परंतु ती येण्या- पूर्वीच मुर्तजा शहाचा खून होऊन फतेखान मौगलास मिळाला, तथापि अदिलशाही सैन्य निजामशहाच्या मदतीस आले, याबद्दल मोंगल लोकांस राग आला, आणि प्रसिद्ध मोगल सरदार व राणी नूरजहान हिचा भाऊ आसफखान यानें विजापूरवर स्वारी केली; परंतु ती अयशश्वी होऊन त्यास आदिलशाही प्रांतांतून परत येणें भाग पडलें. ही हकीकत शहाजहान यास कळल्यावर त्यानें ताबडतोब मोहबतखान यास दक्षिणेत पाठविलें; तेव्हा पुन्हा निजामशाही सैन्यानें अदिलशहाची मदत मागितली; त्याप्रमाणें आदिलशहानें रणदुल्लाखान व मुरारराव या उभयतां सरदारांना त्यांच्या मदतीस पाठविलें; इकडे मॉगल सरदार मोहबतखान हा स्वतः मोठी फौज घेऊन मार्च महिन्याचे शरंमी दौलताबादेस येऊन धडकला; तेथील किल्ला हस्तगत करून घेण्याचा मोठ्या चिकाटीने प्रयत्न केला व अखेरीस तो हस्तगत करून घेऊन ( ३० सन १६३३ जून) त्यानें निजामशाही राज्य नष्ट करून टाकिलें.
तथापि शहाजी हा निजामशाही राज्य पुन्हां जिवंत करण्याच्या खटपटीत होता, आणि त्याने निजामशाहीतील बरेच परगणे व किल्ले हस्तगत करून घेतले होते. त्यानें जुन्नरच्या पश्चिमेस तीस मैलांवर जीवधन कर्फ अंजराई या नांवाचा एक किल्ला आहे,
२०