नवीन शहाच्या नावानें तो राज्यकारभार करूं लागला व लवकरच त्याने सर्व कोंकण-
पट्टी व पूर्वेस अहंमदनगरापर्यंत व निरानदीपासून चांदवडच्या किल्लचोपर्यंत सर्व प्रदेश
आपल्या हस्तगत करून घेतला; तेव्हां आजपर्यंतची सर्व खटपट व्यर्थ झाली असें
पाहून शहाजहान यानें खान डौरान व खान झमन या उभयतां सरदारांना शहाजीवर
पाठविलें, व मागाहून आपण स्वत:ही दक्षिणेत येऊन दाखल झाला; तथापि शहाजहान
दक्षिणेंत येऊन दाखल होण्यापूर्वी शहाजीनें या उभयतां मोगल सरदारांना बिलकुल दाद
दिली नव्हती, कारण त्याने स्वतः मोठें सैन्य जमा केलेले होतें; त्यास विजापुरकर आदि
लशहा, दिवाण मुरारपंत व सेनापती रणदुल्लाखान यांची पूर्ण मदत होती व त्यामुळे त्या
उभयताही मोंगल सरदारांस शहाजीचा पराभव करणे कठीण झालें होतें.
शहाजहान दक्षिणेत येऊन दाखल झाल्याबरोबर त्याने पहिल्यानें विजापुरकराकडे
वकील पाठविले; आणि अदिलशहाशी असे बोलगें लाविलें कीं, “निजामशाही राज्याचे
तुझी घेतलेले किल्ले परत द्यावे; तुझीं परिंडा किल्ल्यावरून विजापूर येथे नेलेली “मुलुख-मैदान " तोफ आह्मांस द्यावी; विशेषतः शहाजांचा पक्ष सोडावा व त्यास अथवा त्याच्या पक्षांतील लोकांस बिलकुल मदत करूं नये; याप्रमाणे वागण्याला तुझी कबूल असल्यास तुह्मांत निजामशाहीतील सर्व कोकणपट्टी, सोलापूरचा किल्ला व त्याखालील प्रदेश देऊं;व त्याप्रमाणे वागण्याला तुह्मी नाकबूल असल्यास तुमचेंही राज्य आह्मी निःसंशय बुडवून टाकूं; " परंतु शहाजहानचें ह्मणणे अदिलशहानें अमान्य केले व शहाजीच्याच पक्षास तो चिकटून राहिला; तेव्हां शहाजहाननें आपल्या सैन्याचे चार भाग करून त्यांतील दोघांची विजापुरकरावर व दोघांची शहाजीवर रवानगी केली; शहाजीवर पाठविलेल्या सैन्यापैकी एका भागावर शाएस्तेखानाची नेमणूक केली होती व त्यास चांदवड, नाशीक आणि संगमनेर कडील शहाजीच्या ताब्यांतील किल्ले हस्तगत करून घेण्याची कामगिरी सौंपविली होती; व दुसऱ्या भागावर खान जमान यास नेमून शहाजीस दक्षिणेतील मैदान प्रदेशांतून हाकलून लावून त्याचा पाठलाग करण्याचा व त्याच्या ताब्यांतील कोंकणपट्टीतील किल्ले ताब्यात घेण्याचा हुकूम
टीप:- १ चांदवड हा तालुक्याचा गांव, हल्लीं नाशिक जिल्ह्यांत असून लासल-
गांव रेलवेस्टेशनपासून चांदवड १४ मैल आहे; दोन्ही ठिकाणी जाण्यास सडक असून
चांदवड हे पूर्वकाळी एक महत्वाचे ठिकाण होतें; हे ठिकाण पूर्वी होळकराच्या ताब्यांत होते;तेथील कांहीं स्थळे प्रेक्षणीय असून किल्लाही विशेष अवघड, बळकट व समुद्रसपाटीपासून अजमातें ३९९४ फूट उंचीवर आहे; व लासलगांव स्टेशनपासून पिंचूरचा किल्ला ३ मैलांवर आहे.