Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४३ )

दिला होता, त्याप्रमाणे शारस्तेखानानें चांदवड, नाशीक व संगमनेरकडील शहाजीच्या ताब्यांतील त्रिंथक, शिवनेरी व कोंडाणा वगैरे किल्ल्यांशिवाय सुमारे पंचवीस किल्ले हस्तगत करून घेतले; आणि खानजमान यानेही कोंकणपट्टीत धुमाकूळ उडवून शहाजीस त्रासवून सोडिलें; व इकडे आदिलशहानेही शहाजहानशी तह केला; तेव्हां शहाजी कोंकण- प्रांताकडे वळला; परंतु मोगली फौजेनें त्याचा सारखा पिच्छा पुरविला; तेव्हां अखेरीस चोहोबाजूंनी शहाजीचा नाइलाज झाल्यावर तो शहाजहान बादशहास शरण गेला; व आपणांस पदरी ठेवण्याच त्यानें बादशहास विनंती केली; परंतु ती त्यानें मान्य न करितां त्यास विजापूरकराच्या पदरीं चाकरीस राहण्याची परवानगी दिली व त्यानें निजामशाही गादीवर स्थापन केलेल्या बालराजास ( मूर्तिजाशहा यास ) ग्वाल्हेर येथील किल्ल्यांत प्रतिबंधांत ठेवून निजामशाही राज्याचा शेवट केला; अशारीतीनें बहामनी राज्यापासून निर्माण झालेल्या पांच राज्यांपैकींच है चवथें व महत्वाचे " निजामशाही " राज्य कायमचें नष्ट झाले.

 भोसले घराण्यांतील राजे शहाजी यांच्याप्रमाणेच शिर्के घराण्यांतील राजे वाघोजी या नांवाच्या एका शूर मराठा पुरुषाचा निजामशाहीत उत्कर्ष झाला; व त्याच्या कर्तृत्वशक्तीवर निजामशहाने त्यास " रायरी " ऊर्फ रायगड ह्या प्रांताच्या बारा महालांची सरदेशमुखी करून दिली. पुढे वाघोजीराजे व त्याचा मुलगा तान्हाजीराजे निजामशाहीमध्ये बादशाही मनसचीवर होते; त्यामुळे रायरी प्रांताच्या वतनावर तेथील कारभार पाहण्याकरितां त्यांनी दलपतराव या नांवाचा एक पाताणे प्रभू जातीचा मुतालिक ठेविला होता. पुढें अदिलशाही व निजामशाही राज्यांमध्यें युद्धकलह सुरू झाले; तेव्हां शिक्यांनी आदिलशाही प्रदेशास अतीशय उपद्रव दिला; तेव्हां आदिलशहाने त्यांच्यावर चंद्रराव मोरे यास पाठवून त्यांचा रायरी किल्ला काबीज करविला; ( ३० सन १५७८ ) तेव्हां ते तळ कोंकणांत शृंगारपूर येथील मराठे सरदार सुर्वे यांच्या आश्रयास गेले; सुर्वे व शिर्के या उभयतां सरदारांचे ना असून सूर्याजीराजे सुर्वे यांची कन्या वाघोजीराजे शिर्के यांचा धाकटा मुलगा पिलाजी- राजे यास दिली होती, हे सुर्वे विजापूरच्या आदिलशाही राज्यांत मनसबदार होते; त्यामुळे त्यांनी खटपट करून, आपल्या वशिल्याने शिर्के यांस दाभोळचें सरदेशमुखीचें वतन मिळवून दिले होते; परंतु शिवाजीनें कोकणप्रांत काबीज केल्यामुळे त्या वतनाचा भोगवटा झाला नाहीं. पुढे शिवाजीनें शिर्के सरदार आपणास अनुकूल करून घेऊन पिलाजीरावाचा मुलगा गणोजीराव यास आपली कन्या राजकुंवरबाई दिली; व पिलाजीराव याची कन्या येसूबाई ही आपला मुलगा संभाजी यास करून घेतली. याच पिलाजीरावानें वाडीचा लक्ष्मण सवित व शिवाजी यांचा तह करून दिला त्यावेळी शिवाजीनें राजकुंवर हॉस जो