Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४१ )

इतकेच नाही तर तो फत्तेखानास सरदारीही देणार होता; परंतु यापूर्वीच त्याच्यी डोक्यास एक जखम झाली होती व त्यामुळे त्याचा मेंदू बिघडून तो भ्रमिष्ट झाला होता; ह्मणून बादशहाने त्यास सरदारी न देता सालीना दोन लक्षांची नेमणूक करून देऊन लाहोर येथे राहण्याची परवानगी दिली; व त्याच ठिकाणी अखेरीस तो मृत्यू पावला. `ल्याप्रमाणेंच त्याचा दुसरा भाऊ चंगीजखान हा पूर्वीच मोगल बादशहाच्या आश्रयास जाऊन राहिलेला होता, स्यास शहाजहान यान " मनसूरखान " असा किताब देऊन दोन हजार स्वारांची मनसची दिली; निजामशाही राज्य खालसा करून आपल्या प्रचंड मोगल 'बादशाहीत सामील केले; आणि अशारीतीनें निजामशाही राज्याची स्थापना झाल्यापासून दीडशे वर्षांनी ह्मणजे इ० सन १६३३ मध्ये त्याची समाप्ती झाली.

 परंतु, मन मोगलांच्या महाराज्यांत मिसळून गेलेला हा निजामशाही राज्यपुरुष, आपल्या समशेरीच्या संजीवनीने पुन्हां जिवंत करण्यास एक धडाडीचा कर्तबगार वीर पुढे सरसावला; त्यानें त्या राज्यपुरुषास जिवंत करून, तो राजा निर्माण करण्याचा राज्यकारभार करण्याचा धंदा करूं लागला; या सरदाराने स्वीकारिलेला हा धंदा, हीच मराठ्यांच्या राज्यसंस्थापनेची पूर्वतयारी होती; हिंदुस्थानच्या राजकीय रंगभूमीवरील मराठ्यांच्या भावी काळांतील उत्कषीची "नदि होती. चा मराठा वीरपुरुषाने सुरू केलेला हाच धंदा पुढे मराठ्यांनी चालू ठेविला; आणि इ० सन १७७१ च्या दिजंबर महिन्यापर्यंत तर ते या धंद्यांत इतके पटाईत, इतके तयार व इतके तरबेज झाले कीं, त्यांनी आपल्या सैन्याने व शस्त्राने, तरवारीस तोफखान्याचे जंगी पाटवळ देऊन, बादशहा शहाअलम यास तो अलाहाबादेहून दिल्ली येथे येण्यास निघाल्यावर कुरा प्रांताच्या सरहद्दीपर्यंत त्याला पोहोचविण्यास आलेला इंग्रजी तुकडीवरील अधिकारी " मरा- व्यांची संगत धरूं नका. " असे बजावीत असतांही जो " डोळे मिटून " मराठ्यांना येऊन मिळाला त्या चादशहा शहाअलम यास दिल्ली येथील बादशाही तख्तावर सहज स्थानापन्न करून टाकिलें, हणून आणि या दृष्टीने विचार केला ह्मणजे " निजामशाही राज्य एका मराठा सरदाराने पुन्हा जिवंत करणें " ही गोष्ट जरी त्यति अखेरीस अपयश आले तरी — अत्यंत महत्वाची आहे असें ह्मणण्यास कांहींच हरकत नाहीं.

 हा मराठा वीरपुरुष ह्मणजे शिवछत्रपतीचा पिता " राजे" शहाजी मोंसले हा होय. दौलताबादचा किल। मोंगल लोकांच्या हाती गेल्यानंतर शहाजी हा पश्चिमे- कडील सह्याद्री पर्वताच्या डोंगरी प्रदेशांत राहू लागला. याठिकाणी त्याने बरेच मोठें सैन्य जमविलें; निजामशाही गांदीवर एका मुलाची स्थापना केली; 'बरेच किल्ले व प्रदेश आपल्या ताब्यांत घेऊन व कित्येक हुषार ब्राह्मण नोकरीस ठेवून ज्यांच्या सळ्ल्ह्याने