Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४०)

पोहोचण्यापूर्वीच शहाजांसह आदिलशाही फौज तेथे येऊन थडकली होती; त्यामुळे मोंगल सैन्य तेथें आल्यावर उभयतांच्या सैन्यामध्ये मोठाच युद्धसंग्राम झाला व त्यांत शहाजीही मोठ्या शौर्याने लढलो; तथापि अखेरीस आदिलशाही सैन्याचा पराभव होऊन त्यास दौलताबादेहून सोळा मैल माघार घेऊन परत जावें लागलें.

 त्यानंतर आदिलशहानें फत्तेखानास मोंगलांच्या गोटांतून फोडून व त्यास स्वतः- कडे ओढून घेऊन आपला पक्ष प्रबळ करण्याचा प्रयत्न केला व त्यांत त्यास यशही आले. त्यानें फरोखानास असे कळविलें कीं, तुझीं दौलताबादचा किल्ला मोगलांच्या हवाली केल्यास आपण होऊनच आपल्या शत्रूस - घरांत घेऊन स्वतःचा सर्वस्वी नाश करून घेतला असे होईल; उलटपक्षी तुझी शहाजीस पुन्हा आपल्या नोकरीत घेऊन दौलताबादचा किल्ला परत आमच्या स्वाधीन कराल तर आपले व आमचें पूर्वीप्रमाणेच पुन्हां सख्या होईल; व आह्मांकडून तुह्मांस मोंगलांविरुद्ध हरएक प्रकारची मदतहि देण्यांत येईल, हा निरोप पोहोचल्यावर फत्तेखानास आदिलशहाची मसलत पसंत पडून तो त्याच्या पक्षास मिळाला व त्यानें मोगलांस दौलताबादचा किल्ला देण्याचें नाकारिलें, आणि किल्लयां- तून फत्तेखानानें व बाहेरून आदिलशाही सैन्याने मोंगली सैन्यावर तोफांचा बेलगार कर- प्यास प्रारंभ केला, परंतु फत्तेखानाच्या या अस्थीर व विश्वासघातकी वर्तनामुळे, मोंगल सरदार महोचतखान – ज्याने एकावेळी खुद्द जहांगीर बादशहास कैद केलें होतें, तो प्रसिद्ध व बलिष्ठ योद्धा मोहबतखान - अत्यंत चिडीस गेला; त्याने निजामशाही राज्याचा समूळ उच्छेद करण्याचा निश्चय केला; आपल्या जोरदार सैन्याचे तीन भाग केले; यापैकी एकाला आदिलशाही सैन्याचा चुराडा उडविण्याची कामगिरी सोपविली, दुसन्याला आपल्या फौजेस धान्यसामुग्री पुरविण्याच्या कामावर ठेविलें तिसन्यास किल्यावर कोणत्याही प्रकारची सामग्री जाऊं न देण्याविषयींची कामगिरी दिली; सैन्याच्या मुख्य भागावर स्वतः देखरेख ठेवून किल्ल्यास मोठ्या जोराचा वेढा दिला, आणि फत्तेखानाच्या आवडावीचा बदला घेण्याच्या खुनशी इर्षेनें व खऱ्या अट्टाहासानें त्याने किल्ला हस्तगत करून घेण्याकरितां नेटाचे प्रयत्न सुरू केले. किल्लयांतील लोकांनीही मोठ्या शौर्यानें युद्ध करून सतत अट्ठावन दिवस किल्ला लढविला; परंतु किल्ल्यांत धान्यांमुग्रीचा पूर्ण दुष्काळ होऊन लोकांची अन्नान्नदशा झाली, त्यामुळे किल्ला अखेरीस मोंगलांच्या ताब्यांत ओला. (ता. १३ जून इ. सन १६३०) फत्तेखान व बालराजा हुसेन मोंगलास शरण आले; व त्या उभयतांनाही कैद करून दिल्ली येथे शहाजहान बादशहाकडे पाठविण्यांत आले; त्यानंतर शहाजहाननें हुसेनशहास ग्वाल्हेरच्या किल्ल्यांवर प्रतिबंधांत ठेविलें; फतेखानावर शहाजहानची कृपा होऊन त्याची सर्व मालमिळकत त्यास परत मिळाली;