घालून त्यांची अशी धूळधाण उडविली की, त्या उभयतांच्या सैन्यातील बहुतेक सरदार धरले अथवा मारले गेले; आणि लखुजी जाधव व माहूरचा देशमुख उदाराम ऊर्फ उद्भावरोव हे पहिल्याच तडाक्यास पळून गेले, ह्मणून बचावले, मांडक यांच्या ह्मणण्याप्रमाणे निजामशहा याने फत्तेखान ( मलिकंबरचा वडील मुलगा ) यास वजीरी- पदावरून दूर करून प्रतिबंधांत ठेविल्यावर लखूजी जाधव यानें शहास, " मी पुन्हा तुमच्या आश्रयास येतो; अशी विनंति केली; परंतु शहा हा स्वभावानें खुनशी अमून, लखूजी हा आपला पक्ष सोडून मोगलास जाऊन मिळाला; त्यामुळे त्याच्या
१ टीप:- उद्धवराव यास " वासीमचे राजे" अशीही संज्ञा आहे. हा ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण असून त्यास अकचराने वासीम व माहूर या दोन परगण्यांची पांच हजारी मनसब दिली होती. उद्धवराव मृत्यू पावला त्यावेळी त्याचा मुलगा जगजीवन हा अज्ञान असल्यामुळे त्याची आई सर्व कारभार पहात असे. ही बाई मोठा शूर व राजकारणी होती; उद्धवराव मृत्यू पावलेला, मुलगा अज्ञान व कारभारी बाई माणूस असें पाहून, हरचंदराय याने त्या प्रांतावर स्वारी केली; ती या बाईने मोठ्या शौर्याने परत फिरविली; हणून औरंगझेबाने तिला " पंडिता " " व रायबागीण ( ह्मणजे शार्दूल ) असे दोन किताब दिले. या बाईचें व शिवाजीमहाराजांचें इ० सन १६७० मध्ये उमरखिंडीत युद्ध झाले असून त्याबद्दल बखरीत उल्लेख आहे आणि शिवकालीन प्रसिद्ध घराण्यापैकीचें हें एक घराणे असून त्यास शिंदखेडकर जाध- चांच्या खालोखाल मान आहे.
सूचनाः- यासंबंधी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नवव्या संमेलनांत आमचे मित्र रा. यादव माधव काळे B. ALL B. वकील बुलढाणा यांनी एक मोठा माहितीपूर्ण निबंध वाचिला; तो या घराण्यासंबंधी अधीक माहिती पाहिजे असल्यास वाचावा.
खुलासाः - वाशीम हे तालुक्याचें गांव वन्हाडांत अकोले जिल्ह्यात अकोल्या- पासून सडकेनें अजमासे ५१ मैलांवर आहे, शिंदखेड हॅ बुलढाणा जिल्ह्यांतील मेह- कर तालुक्यांत अजमासे १९ मैलांवर निजामच्या सरहद्दीवर आहे. उमरखंड हैं यक्त- माळ जिल्ह्यांत पुसद तालुक्यांत आहे व जवळच उमरखिंड आहे. जी. आय. पी रेलवेच्या नागपूर लाइनीवरील मूर्तिजापूरपासून यवतमाळपर्यंत जो फांटा गेला आहे, त्यावर दारव्हा ह्मणून एक रेलवे स्टेशन आहे; तेथून दिग्रस, पुसद, उमरखेड व माहूर असा रस्ता गेलेला आहे. दारव्हा येथून दिवस अजमासें १८, पुढे पुसद १८, पुढे उमरखेड २० ब येथून निजामच्या हद्दींत वीस मैलांच्या आतच माहूर हे ठिकाण आहे.