Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३५ )

मनांत लखूजीविषयीं तीय द्वेष उत्पन्न झाला होता, त्याबद्दल त्याचा सूड उगविण्याची इच्छा शहाच्या मनांत पूर्णपणं वसत होती, आणि " आपल्या राज्यांतील पूर्वीचा सरदार व माहितगार लखुजी जाधव हा मोंगलास मिळालेला आहे, आणि तोच आपल्या राज्यातील छिद्रे मोंगलास दाखवून देत असल्यामुळे मोंगल आपणांस भारी झाले आहेत याकरिता कसेही करून पहिल्यानें लखुजीचा चंदोबस्त केल्याखेरीज आपणास केव्हाही विजयप्राप्ती व्हावयाची नाहीं, " असें त्याच्या सल्लागारांनी त्याच्या मनांत पूर्णपणे भरवून दिल्यामुळे तर कोणत्याही युक्तीप्रयुक्तीनें लखूजीस बोलावून आणून त्यास कैद करण्याचा त्याने बेत केला होता, त्याप्रमाणे मायावी ममत्व व कांगावी कळवळा दाखवून त्यानें लखूजी जाधवास भुरळ पाडली व त्यास आपल्या भेटीस बोलावून घेतलें. शहाच्या बोलवण्याप्रमाणे लखूजी आपल्या घरच्या मंडळीसह दौलताबाद येथे येऊन त्यानें आपल्या सैन्यासह शहराबाहेर तळ दिला व त्याचा भाऊ जगदेवराव हा किल्ल्याबाहेर कोतुळुकच्या तळ्यावर उतरला. ठरलेल्या दिवशी लखुजी जाधवराव ( याचे सर्व नांव लुकजी कुरुजी यादव असे असल्याचे " मराठ्यांच्या इतिहासाची साधनें " खंड १५ " शिवकालीन घराण्यांचे पत्रव्यवहार " लेखांक ३ पान १३ वर लिहिलेले आहे. ) हा आपले मुलगे अचलोजी व राघोजी व नातू वसंतराव व इतर आप्तस्वकीय लोक बरोबर घेऊन किल्ल्यावर गेला; तेथे गेल्यावर या सर्व लोकांना असे समजविण्यांत आलें कीं, सरकार स्वारीस तुमची भीति वाटते; ह्मणून तुझी पहान्यावर आपली हत्यारे ठेवून राजवाड्यांत गेलात तरच तुमची व हुजू- रची भेट होईल; नाहीं तर होणार नाहीं. " लखूजीच्या मनांत शहा आपणास दुगा करील असा कोणत्याही प्रकारें संशय नसल्यामुळे त्यानें शहाच्या इच्छेप्रमाणे पहा-या- वर आपली तरवार सोडून ठेविली व आपल्या सर्व अनुयायांकडूनही तसेंच कर विलें, त्यानंतर ही सर्व मंडळी राजवाड्यांत गेली; दरबार होऊन निजामशहाची भेट झाली व निजामशहा क्षणभर बसून व बोलून काहीं निमित्ताने उठून गेला, तोंच दरबारच्या दिवाणखान्यांत मारेकरी घुसले व लखूजीस कैद करूं लागले; परंतु कैद


शिंदखेड हे शिवाजी महाराजांची आई जिजाबाई हिच्या माहेरचें ह्मणजे लखूजी जाधवाचें गांव आहे. माहूर है श्रीगुरुदेवदत्त महाराजांचें निद्रास्थान असून, ते एक तीर्थ- यात्रेचे महत्वाचे प्रसिद्ध व साक्षात्कारी देवस्थान आहे. निजामच्या राज्याची हद्द व वन्हाडची हृद्व यांच्यामध्ये उमराखंड आहे आणि उमरखेड येथे प्रसिद्ध गोचरस्वामीचा मठ असून ते व मेहकर ही पैनगंगा नदीच्या कांटी आहेत; आणि मेहकर व वासीम येथें श्रीबालाजी महाराजांची प्रसिद्ध देवालये आहेत.