Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३३ )

असलेला बजार फतेखान यास त्या पदावरून दूर करून खिवरच्या किल्ल्यांत प्रतिबंधांत ठेविलें व त्याच्या जागी तकरीबखान या नांवाच्या सरदाराची नेमणूक करून तो राज्यकारभार करूं लागला. मागे उल्लेख केल्याप्रमाणे लुकजी जाधवराव या नांवाचा एक प्रमुख, प्रचळ व महत्वाकांक्षी मराठा सरदार निजामशाहीत नोकरीत होता. इ० सन १६२१ च्या सुमारास मलिकंबरचे मोगल सैन्याशी मोठ्या निकराचे युद्ध होऊन त्यांत मलिकंबरचा पूर्ण पराजय झाला; त्यावेळी त्याच्या पक्षाचे जे कित्येक मराठे सरदार फितूर होऊन मोंगलांस मिळाले त्यांत लखुजी जाधवराव हा प्रमुख होता व त्याचा माँगल बादशहाने अतीशय गौरव करून त्यास चोवीस हजार पायदळ व १५ हजार स्वारांची मनसबदारी दिली होती. लखुजी जाधवराव हा देवगिरीकर रामदेवराव जाधव (ऊर्फ यादव याच्याच घराण्यांतील असून त्यास निजामशाहीत दहा हजारांची मनसबदारी होती. ) देवगिरीकर रामदेवराव यास शंकरदेव व भीमदेव असे दोन मुलगे होते, त्यांपैकी शंकरदेवाचा मुलगा गोविंददेव ( इ० सन १३१२ ते इ० सन १८० ) यानें हसन गंगू यास बहामनी राज्य स्थापन करण्यांत मदत केली होती व बागलाण प्रांतांत कांहीं प्रदेश हस्तगत करून घेऊन तो तिकडेच रहात होता. पुढे त्याचा मुलगा ठाकुरजी ( इ सन १३८० ते इ० सन १४२९ ) हा हल्लीं निजामशाहीत वन्हाडच्या सरहद्दीवर असलेल्या शिंदखेड या गावी गेला व तेथे त्याने देशमुखी वतन मिळविले. पुढे त्याचा मुलगा भूखणदेव ऊर्फ भेतोजी यान खानदेशांतील बराच प्रदेश मिळवून बहामनी दरबारात आपले महत्व वाढविले; त्याचा मुलगा अचलकर्ण ऊर्फ अचलोजी याच्या वेळेस बहामनी राज्य नष्ट झालें व शिंदखेडकडील प्रदेश निजानशाही अमलाखाली आला; या काळांत प्रसिद्ध कंवरसेन हा निजामशाही राज्याचा दिवाण होना; त्याच्या कारकीर्दीत मराठ्यांचा दुष्कळच उत्कर्ष झाला व त्याने अनेक मराठे सरदारांना 'निजामशाही सैन्यांत मनसची दिल्या, त्यावेळीं अचलकर्ण ( इ० सन १५०० ते इ० सन १५४० ) यांसही पांच हजार स्वारांची मनसची दिली; त्याचा मुलगा विठ्ठलदेव हाही असाच निजामशाही राज्यांत मनसबदार असून नालीकोटजवळील विजयानगरकराविरुद्धच्या घनघोर युद्धात त्याने भाग घेत- लेला होता त्याचाच मुलगा लक्ष्मणदेव ऊर्फ लखूजी ( लुकजी ) जाधव ( इ० सन १५७१ ते सन १६२९ ) हा असून हा तर निजामशाहीत व मोंगली राज्यांतही बलिष्ट सरदार ह्मणूनच गणला गेला होता, हा सरदार निजामशाही पक्ष सोडून मोंगलास जाऊन मिळाल्यावर लवकरच त्याच्यावर प्राणसंकट ओढवले; व त्यांतच अखेरीस त्याचा अंत झाला. मलिकंबर यानें इ० सन १६२४ मध्ये मोंगली व अदिलशाही फौजेवर, निजामच्या राज्यांतील भातवाडी याठिकाणी अकस्मात मोठ्या जोराचा छापा