मलिकंचरच्या अंगीं अनेक सद्गुण वास करीत असल्यानें मलिकंबरची कारकीर्द महा- राष्ट्रामध्यें अतीशय लोकप्रिय झाली; आणि दक्षिणेतील उत्तम राज्यकर्त्या मुत्सद्ध्यांमध्ये त्याचे नांव चिरकाल दाखल झाले. थोडक्यांतच ह्मणजे " जहांगीरनामा " या ग्रंथांत लिहिल्याप्रमाणें ह्मणावयाचे ह्मणजे, युद्धकला, सेनापतित्र व्यवहारज्ञान आणि राज्यशासन ह्या गुणांमध्ये मलिकचरच्या तोडांचा दुसरा कोणीही पुरुष नाहीं. त्याला दक्षिणी लोकांची - ह्मणजे मराठ्यांची -- लढाईची पद्धति " कझाकी " ( Predatory Warfare) चांगली माहिती होती. ( तिला मराठी भाषेत " बर्गेगिरी " हैं नांव आहे. ) त्यानें दंगेखोर लोकांना दाचामध्यें ठेविलें, आणि शेवटपर्यंत आपला मोठा दर्जा कायम राखुन सन्मानाने आपल्या कारकीर्दीची समाप्ती केली. एक हबशी गुलाम-मलिकंबर- एवढ्या मोठ्या पदावर चढल्याचें इतिहासांत दुसरें उदाहरण नाही; आणि या एका अभिप्रावावरूनच त्याची असामान्य योग्यता व कर्तृत्व याबद्दल काहीही संदेह रहात नाहीं.
मलिकंबर यास फत्तेखान व चंगीझखान असे दोन मुलगे होते; परंतु या उभयकि एकाच्याही अंगीं मलिकंबरचें कर्तृत्व व शहाणपण वसत नव्हते. तथापि त्यांना त्यांत फतेखान हा अगदीच कर्तृत्वहीन अथवा नालायक नव्हता; आणि निजाम- शाही जिवंत राखण्याविषयीं त्यानेही - जरी मलिकंबरइतका नाहीं तरी- थोडाफार प्रयत्न केला होता. मूर्तुजा निजामशहा हा मूर्ख व नालायक राज्यकर्ता होता, परंतु मलिकंबर जिवंत होता, तोपर्यंत त्याने शहास आपल्या योग्य नियंत्रणाखाली आणि सरदार- मंडळावर योग्य दाच ठेवून राज्यांत कोणत्याही प्रकारची अव्यवस्था अथवा भानगडी होऊ दिल्या नव्हत्या; परंतु मलिकंबर मृत्यू पावल्यावर शहाला व शिरजोर सरदार मंडळीला योग्यप्रकारें दावांत ठेवील असा एकही अधिकारी पुरूष निजामशाही राज्यांत अस्तित्वांत नव्हता; त्यामुळे शहाचा अनियंत्रित कारभार सुरू झाला, निजामशाही सरदार आपस तिच तंटाभांडणे करूं लागले, आणि फतेखानांत योग्य नियंत्रणशक्ति नसल्यामुळे त्याला कोणीही जुमानीनासें झालें. ही संधी साधून मोगलांनी पुन्हां निजामशाहीवर चढाई केली; आणि फत्तेखानास त्यांनी इतकें भासवून सोडलें कीं, न्यास अखेरीस नाइलाजानें मोगलांशी सख्य करणे भाग पडलें. ( इ० सन १६२७ ). त्यावेळी खानजहान लोदी यानें ( हा सरदार यावेळीं दक्षिणप्रांताचा सुभेदार होता; ) निजामशहाजवळून लोचा- दाखल भली मोठी रक्कम घेऊन त्याच्याशी सख्य केले, आणि मोंगली सैन्यानें आपल्या ताब्यांत घेतलेला सर्व प्रदेश त्याने पुन्हा शहास परत दिला.
त्यानंतर निजामशहाने आपल्या कित्येक सल्लागारांच्या सांगण्यावरून फत्तेखान यास - मूर्तजा निजामशहाची आई ही फत्तेखानाची बहीण होती; म्हणजे शहाने आपला मामा