त्याने मोंगलांच्या ताब्यांतून पूर्वी घेतलेला प्रदेश म्हणजे अहमदनगर व त्या सभोवतालचा प्रदेश, शहाजहान यास परत देऊन ( इ० सन १६२४ च्या सुमारास) त्याच्याशी तह केला.
परंतु पुढे शहाजहान दक्षिणेतून काश्मीरकडे निघून गेल्यावर मलिकंबरने त्या प्रदेशावर स्वारी करून तो हस्तगत करून घेतला; तेव्हां न्हाणपूर येथील मोंगल अधि- कान्यानें जहांगीर यास ही हकीकत कळवून ताबडतोच कुमक पाठविण्याविषयी विनंती केली; त्याबरोबर त्याने शहाजहान यास मोठ्या सैन्यानिशीं दक्षिणेत पाठविले; परंतु तो इकडे येऊन दाखल होण्यापूर्वीच मल्किंचर यार्ने थेट नर्मदा नदीपर्यंतच्या प्रदेशांत लूट केली व नर्मदा नदी उतरून मांडू शहरावर चाल करून जाऊन तेथील वेशीच्या बाहेरील घरही त्याने लुटून फक्त करून टाकिल; इतक्यांत शहाजहानने तेथे येऊन त्याचा पराभव केला, त्याचे गनीमी काव्याचे प्रत्येक डावपेंच मोडून काढिले आणि त्यास आपणास शरण येणें भाग पाडले; त्यानंतर मलिकंबरनें शहाजहानशी तह केला व आपले परत घेतलेले प्रांत त्याने पुन्हां मोंगलांच्या ताब्यांत देऊन त्यांच्याशी सख्य केलें.
स्थानंतर मलिकंबर हा मोंगलाशी सख्यत्वाने वागला व उलट मगलानींही त्यास उपद्रव न देतो तें सख्यत्व कायम ठेविलें. मलिकंबर यास पुन्हां अशारीतीने शांततेचा लाभ झाल्यावर त्यानें निजामशाही राज्याची भरभराट करण्याचे परिश्रम घेतले, आणि आस- पासच्या राज्यावरही आपला दरारा बसवून विजापूर व गोवळकोंडे, येथील राज्यकर्त्यां- कडून खंडण्याही वसूल केल्या. याप्रमाणे मोठ्या वैभवानें, कीर्तिनें व इभ्रतीनें, राज्य- कारभार करीत, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी इ० सन १६२६ मध्ये मृत्यू पावला व त्यानें दौलताबाद येथें जो एक मोठा घुमट बांधिला, त्यातच त्याचे दफन करण्यांत आलें. याठिकाणी मलिकंबरची कबर असून तिच्या संरक्षणाकरितां ठेविलेल्या नौकर लोकांस त्यावेळी इनाम जमीनी लावून दिल्या होत्या, त्या अद्यापि त्यांच्या वंशजाकडे चालत आहेत. मलिकंबर हा मोठा न्यायो, धार्मिक व उदार असून शिवाय तो कसलेला योद्धा व नामांकित मुत्सद्दी होता; आणि त्या कालच्या दक्षिणेतील कर्तृत्ववान् पुरुषांमध्यें तो अग्रगण्य ह्मणून गणला गेला होता; मलिकंबरच्या असामान्य योग्यतेबद्दल – त्याची न्यायबुद्धि, समता, सहिष्णुत्व, प्रजेविषयी प्रेमभाव व सुखकर राज्यपद्धति वगैरे गुणांबद्दल अनेक मुसलमान व इंग्रज इतिहासकारांनी मोठे प्रशंसनीय उद्गार काढले आहेत. मलिकंबर यानें हिंदू आणि मुसलमान हा भेदभाव केव्हाही मनांत आणिला नाहीं, त्यानें हिंदूंच्या देवस्थानाचे रक्षण करून त्यांची उत्पन्न चालविली; इतकेच नाहीं तर चिंचवड येथील मोरया देवास त्याने एक नवीन इनाम करून दिलें. त्याप्रमाणेंच त्यानें ब्राह्मण, मराठे वगैरे मंडळास त्यांच्या कर्तबगारीप्रमाणे राज्यकारभारांत मोठमोठ्या जागा दिल्या. अशारीतीनें