Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३० )

त्याच्या खजिन्याची स्थिति सदोदित समाधानकारक राहिली व प्रजा सधन, समृद्ध व सुखी झाली; त्याप्रमाणेच त्याने ग्रामसंस्थेचेही पुनरुज्जीवन केले व पाटील-कुलकर्णी यांची व इतर ग्रामाधिकान्यांची वतने वंशपरंपरेचीं केलीं. सारांश मलिकंबर यानें निजामशाही राज्य- व्यवस्थेंत अनेक महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणून दक्षिणेच्या इतिहासांत आपले नवि अजरामर करून ठेविलें आहे, यांत कांहींही संदेह नाहीं.

 मलिकंबर यानें, मोंगली राज्यांत उत्पन्न झालेल्या निरनिराळ्या भानगडींचा पूर्ण फायदा घेऊन, निजामशाही राज्याची उत्तम व्यवस्था लाविल्यानंतर त्यानें मोंगलाच्या ताव्यांतील प्रदेशावर स्वारी करण्याची तयारी केली; इतक्यांत मोंगली राज्यांतील भानगडी मिटून- दक्षिणेतील निजामशाही राज्यावर एकदम चोहोंकडून हल्ले करून त्या राज्याची लांडगेतोड करावी व मलिकंचर यास नामोहरम करावें, असा जहांगीर बादशहाने मनसुबा घडविला; आणि गुजराथचा मोंगल सुभेदार अब्दुल्लाखान यानें निकडून मल्किंबरवर चाल करून यावे व त्याचवेळी शहाजादा पर्वोस् आणि खानजहान लोदी यांनी राजा मानसिंग याची कुमक घेऊन खानदेश व वन्हाड प्रांतांतून मलिकंबरवर चाल करून यावें असा कार्यक्रम ठरविला; परंतु बादशाही फौज येऊन दाखल होण्यापूर्वीच – ह्मणजे नियोजित काळापूर्वीच अब्दुल्लाखान हा एकटाच मलिकंबरवर चाल करून आला; तेव्हां अब्दुल्लाखानाच्या चुकीचा मलिकंबरनें पूर्ण फायदा करून घेण्याचा निश्चय केला; मराठे लोकांप्रमाणेच गनीमी काव्याने लढण्याची युद्धपद्धती मलिकंबर यार्ने स्वीकारलेली असल्यामुळे त्याने अब्दुल्लाखानाच्या सैन्याची इतकी दुर्दशा उडविला व त्यास इतकें भस्त करून सोडिलें कीं, तो कसाबसा आपला जीव जगवून बागलाणच्या डोंगरांत पळाला व तेथून गुजरात निघून गेला. इतक्यति मोगल फौज दक्षिणेत मलिकंबरवर चाल करून आला; परंतु अब्दुल्लाखानाच्या सैन्याची दुर्दशा झाल्याचे कळल्यावर ते सैन्य पुढे न येतां बन्हाणपूर येथेच तळ देऊन जमावानें राहिले.

 त्यानंतर इ० सन १६१७ मध्ये जहांगीर बादशहानें आपला मुलगा शहाजादा शहाबुद्दीन महंमद खुर्रम् ऊर्फ शहाजहान यास दक्षिणेवरील मोहिमांवर पाठविले व आपणही प्रसंग पडल्यास पुढे चाल करून जावें ह्मणून जहांगीर यानें मांडू येथे येऊन तळ दिला. शहाजहान यानें दक्षिणेत आल्यावर विजापूरकर इब्राहीम आदिलशहा यास मलिकंबरच्या स्नेहांतून फोडिलें व मागे उल्लेख केल्याप्रमाणे लुकजी जाधवराव वगैरे कित्येक मराठे सरदारांत फितूरी करून त्यांनाही आपल्या पक्षाचे करून घेतलें. अशारीतीनें गोटांत फितुरी झाल्यामुळे मलिकंबर हा नाइलाजानें शहाजहान यास शरण गेला; आणि