इतक्यांतच शहाजादा दानियल हा मृत्यु पावला व त्याच्याजागी खान- खानान याची नेमणूक होऊन तो बन्हाणपूर येथून जालना येथें गेला, यामुळे मलिकंबर यास आपल्या सत्तेचा विस्तार करण्यास आयतीच संधी मिळाली; व त्याने दौलताबादवर हल्ला करून मियान राजूचा पराभव केला; तेव्हां त्यानें खानखनान यास आपल्या मदतीस बोलाविलें व तो आल्यावर त्यानें उभयतांमध्यें एक तात्पुरता तह घडवून आणिला; त्यानंतर मूर्तजा निजामशहाचे व मलिकंचर याचे परस्परां- विषय शुद्ध मन होऊन शहाने इ० सन १६०७ यावर्षी मलिकंबरसह जुम्नरवर स्वारी करून तेथील किल्ला आपल्या हस्तगत करून घेतला व ते आपल्या राजधानीचें ठिकाण करून निजामशाही गादी तेथें नेली. नंतर शहानें मिआन राजूवर सैन्य पाठ- वून व त्याच्याशी युद्ध करून त्याचा पराभव केला, आणि त्यास कैद करून त्याच्या ताब्यांतील सर्व प्रदेश निजामशाही राज्यांत सामील केला.
प्रसिद्ध इतिहासकार फेरिस्ता यानें निजामशाही राज्याचा लिहिलेला इति- हास इतकाच आहे व तो समाप्त करितांना त्या राज्याच्या तत्कालीन स्थितीविषय न्याने खालीलप्रमाणे लिहिले आहे. तो ह्मणतो:- " मलिकंबरचें महत्व व वर्चस्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शहाअल्लीचा मुलगा मूर्तुजा हा गादीवर आहे; सर्व राज्यकारभार मलिकंबर हा मोठ्या हुषारीनें व दक्षतेने चालवीत आहे; तरी
राज्य लवकरच लयास जाण्याची चिन्हें दिसत आहेत; कारण दिल्लीचा बादशहा तें काबीज करून आपल्या प्रचंड राज्यांत सामील करून घेण्यास योग्य संधीची वाट पहात टपून बसला आहे; व पुढे काय घडून येईल, ส एकट्या परमेश्वराच काय ते माहीत आहे. " फेरिस्त्याचे हॅ भविष्य पुढे लवकरच खरें झालें, आणि निजामशाही राज्य खालसा होऊन तें मोंगल राज्यांत सामील करण्यांत आलें.
चांदबिबीप्रमाणेच निजामशाही राज्याला तारणारा दुसरा पुरुष, ह्यणजे मलिकंबर ( ३० सन १५४६ ते इ० सन १६२६.) हा होय. हा जातीनें हबशी असून पहिल्या मूर्तजा निजामशहाचा इमानी दिवाण चंगीझखान याच्याजवळ नौक- रीस होता व त्याच्याच दिमतींत राहून तो राज्यकारभाराच्या कामांत तरबेज झाला होता. अहमदनगर है शहर मोगलांच्या ताब्यांत होते, हाणून दौलताबादेपासून सहा मैलावर " खडकी " या नांवाचें एक शहर बसवून व तेथे मोठमोठे वाडे व हवेल्या बांधवून स्थानें निजामशाहीची राजधानी केली; व याच ठिकाणी राहून तो राज्यकारभार करूं लागला, याच शहरास पुढे अवरंगज्ञेब बादशहानें " अवरंगाबाद हें नांव दिलें. त्यानें आपल्या पदरी पुष्कळ मराठे सरदार ठेविले होते, शिंदखेडचे