Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२३ )

देशमूख जाधवराव व मालोजी भोंसले हे उभयतांही सरदार पूर्वीपासूनच निजाम• शाही राज्यांत होते; व निजामशाही व आदिलशाही या दोन्हीं राज्यांत लष्करी खात्यांत पुष्कळ मराठे सरदार व इतर मराठे लोक असून ते युद्धविद्येत तरबेज होऊन पुढे पुष्कळच उद्यास आले होते, राजपुत्र सलीम यानें बंड केल्यामुळे अकचर बादशहा उत्तरहिंदुस्थानांत निघून गेल्यावर पुढे लौकरच मृत्यू पावला व राजपुत्र सलीम उर्फ जहांगीर हा गादीवर आला व त्याचा मुलगा खुश्रू यानें बंड उभारिलें, आणि इकडे मोगल सरदार खानसानाने व त्याचे सरदार यांच्यामध्येही बेबनाव होऊन कडाक्याची तंटाभांडणें सुरू झाली. मोंगल बादशाहीत ह्या ज्या अनेक भानगडी सुरू झाल्या होत्या, त्याचा मलिकंबर यानें योग्य फायदा करून घेतला; त्यानें सैन्य जमवून अहमदनगर सुद्धां सर्व निजामशाही प्रदेश आपल्या हस्तगत करून घेतला व खानखानान याचा पराभव करून त्यास मन्हाणपूर येथें निघून जाणे भाग पाडिलें.

 अशारीतीनें मोगल सैन्यास निजामशाही राज्यांतून घालवून दिल्यावर त्यानें देशस्थिती सुधारून मजेची उन्नती करण्याच्या कामास सुरवात केली व त्यति त्याला इतकें पूर्णपणे यश आले की, — उत्तर हिंदुस्थानांतील राजा तोडरमलप्रमाणेच दक्षिणेतील नवीन जमाबंदीबद्दल मलिकंबरचें नांव चिरस्मरणीय झाले आहे.

 मोंगल बादशाहांनी दक्षिणेतील खानदेश, बन्हाड व अहमदनगर ही तीन्हीं राज्य नष्ट करून आपल्या साम्राज्यांत सामील केल्यावर हे तीन नवे सुभे करण्यांत आले व त्यांना राजा तोडरमल याचीच नवी जमाबंदी पद्धत लावण्यांत आली, ह्मणजे दक्षिणेतील कांहीं प्रदेशाशी या पद्धतीचा संबंध असल्यामुळे त्या जमाबंदी पद्धतीचे याठिकाण थोडक्यांत विवेचन केलें आहे; अकबराच्या " ऐने-अकबरी " या ग्रंथा- मध्ये या पद्धतीविषयीं विस्तृत विवेचन केलेले असून त्यासंबंधी इतिहास संग्रहांतही तोडर-मल्लाच्या चरित्रासह त्रोटक माहिती दिली आहे; ती अशी की:-मुसलमानी राज्यकर्त्यांनी जमीनीची पाहणी व मोजणी करून सरकारसारा ठरविण्याचा प्रयत्न, अकबर बादश- हाच्या पूर्वीपासन थोडाबहुत करण्यास प्रारंभ केला होता; पूर्वी " तैमूरची वसूल पद्धति " ह्मणून काही ठोकळ नियम अस्तित्वात होते; शीरशहानें त्यांत चांगली सुधारणा करून जमीनीची आकारणी ठरविली होती, परंतु त्या सर्वामध्यें खरोखर प्रजेस व राज्यास सार- खीच हितकारक, न्यायीपणाची, सुनियंत्रित व सुव्यवस्थित, अशी जर कोणती सुधारणा झाली असेल, तर ती राजा तोडरमल यानें शोधून काढिलेली वसूल पद्धति, हीच होय. ही अद्यापि प्रसिद्ध असून सांप्रतच्या वसूल पद्धतील ती तत्वतः दृग्गोचर झाल्यावांचून स्थान नाही.