Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२१ )

हल्ला करून त्याचा पराभव केला व त्या सैन्यास परत जाणे भाग पाडिलें. तेव्हां खान- खानान यानें आपला मुलगा मिर्झा एरीच यास, मलिकंबरवर पाठविलें; त्यानें झपाट्यानें कूच करून मलिकंचर यास गोदावरी नदीच्या पश्चिम तीरावर नांदेडे शहरापाशी गांटिलें, आणि त्याच्याशीं मोठ्या निकराचें युद्ध केले. त्यांत मलिकंचरचा पराभव होऊन तो जखमी झाला; व त्यास शत्रूच्या हातीत सांपडण्याचाच प्रसंग आला होता; परंतु त्याच्या इमानी लोकांनी स्वतःचा जीव धोक्यांत घालून त्यास सुरक्षितस्थळी नेलें; त्यामुळे त्याचा बचाव झाला. पुढे मलिकंचर बरा झाल्यावर मॉगल सैन्याशी पुन्हां युद्ध करण्याकरितां सैन्य जमवूं लागला; आणि तो शूर व लोकप्रीय असल्यामुळे लवकरच त्याच्याजवळ पुष्कळ सैन्य जमा होईल व त्याच्याशीं होणान्या युद्धांत कदाचित् आपणास पराभूतही व्हावे लागेल, अशी खानखानान यास भीति उत्पन्न झाली; तेव्हा त्याने मलिकचरशीं तहाचें बोलणें लाविलें व उभयतांमध्यें तह ठरून निजामशाही व मोंगली प्रांताच्या सरहद्वी निश्चित झाल्या.

 याच सुमारास व्यंकटराव कोळी, फन्हादखान मोलीद, मलिक सुंदल खोजा वगैरे सरदारांनी मलिकंबरचा पक्ष सोडून ते आवरों येथें जाऊन मूर्तुजा निजाम- शहास मिळाले, तेव्हां मलिकंबर त्यांच्यावर चाल करून गेला व त्यानें त्यांचा पूर्ण पराभव केला. या युद्धांत व्यंकटराव पाडाव होऊन मलिकंचरच्या हाती सांपडला; नंतर त्यानें शहासही आपल्या स्वाधीन करून घेतले व त्यास परिंड्याच्या किल्ल्यांत नेऊन ठेविलें, परंतु तेथें राहिल्यावर लवकरच त्यानें मलिकंचरविरुद्ध मिआन राजू- कडे कागाळ्या केल्या व आपणास मलिकंचर नोटरीतीने वागवीत नाहीं; " असे त्यास कळविलें. तेव्हां मिआन राजू हा परिंडयास जाऊन शहास भेटला व त्यानें मलि - कंबरबरोबर अनेक युद्धप्रसंग करून त्यास बरेंच जेरीस आणिलें; तेव्हां त्यानें मोंगली सरदार खानखानान याची मदत मागितली व त्याच्याकडून बीडचा सुभेदार हुसेन अल्लीवेग हा मदतीस आल्यावर त्याच्या साह्याने मिआन राजू याचा पराभव केला व त्यास माघार घेऊन दौलताबाद येथे जाणें भाग पाडिलें.


 टीप १: - नांदेड है निजामच्या राज्यांत एक जिल्ह्याचे ठिकाण असून तें हैद्राबादपासून १६८ मैलांवर व हिंगोलीपासून ४५ मेलांवर आहे; व तें निजामरेलवेच्या मनमाड-हैद्राबाद रस्त्यावर रेलवेस्टेशन असून, हिंगोली हैं ठिकाण परभणी जिल्ह्यांत आहे. हिंगोली येथें निजामची कांहीं तैनाती फौज ( Haiderabad Subsidiary Force ) रहात असे; हिंगोली है गांव चव्हाडच्या सरहद्वीपासून अजमासें वीस मैल आहे. अकोला येथून हिंगोलीपर्यंत सडक असून, मार्गीत वासीम ( Bassim ) हं तालुक्याचे ठिकाण आहे; अकोल्याहून हिंगोली ८० व बासीमहून २८ मेल आहे.
१६