[१२] पुणे येथील डे० व्ह० ट्रा० सोसायटीकडून या ग्रंथाच्या पहिल्या भागास पन्नास रुपये बक्षीस मिळाले, त्यासंबंधींच्या पत्राचा उतारा. ॥ श्री ॥ नं २४३ सन १९२२/२३ डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटीचें ऑफिस, पुणे शहर ता० २५१८ सन १९२२ रा. रा. दत्तात्रय बाळकृष्ण करकरे, जळगांव पूर्व- खानदेश. यांस. वि. वि. या संस्थंकडून आश्रय मिळावा ह्या हेतूनें आपलें। ता. २३/७/१९२१ चें अर्जासोबत पाठविलेलें पुस्तक मराठ्यांचा इतिहास भाग १ याचे परीक्षण होऊन ता. २२ आगष्ट सन १९२२ रोजीं भरलेल्या व्यवस्थापक मंडळीचे सभेनें असें ठरविले आहे कीं, संस्थेने आपणास सदर पुस्तकाबद्दल रुपये ५० ( पन्नास रु.) बक्षीस द्यावे व आपण संस्थेस सदर पुस्तकाच्या आणखी दोन प्रती द्याव्या. सवव ह्या पत्रासोचत पाठविलेल्या बिलाच्या चारी प्रतींवर पेनसलीनें 'सही' असे लिहिले आहे तेथें सह्या कराव्या व पेनसलीने फुली केली आहे तेथें तारखा घालाव्या आणि सदर सर्व प्रति इकडे ताबडतोव परत पाठविण्याचें करावें. पुस्तकाच्या प्रती व बिलाच्या प्रती आपणाकडून आल्यानंतर पुढील व्यवस्था होऊन सुमारे एक महिन्यानें बक्षीसाची रक्कम आपलेकडे मनी- ऑर्डरीने पाठविण्यांत येईल. कळावें, लोभ करावा हे विनंति. - “ सही इंग्रजी " bhawचिटणीस. TOS F
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१४
Appearance