मराठ्यांचा इतिहास - श्री. दत्तात्रेय बाळकृष्ण करकरे हे हल्ली येथें
आले असून येथें इतिहासप्रिय लोकांस त्यांनी गेल्या बुधवारी सुमारे दोन अडीच तास
फारच श्रमपूर्वक मिळविलेली अशी उत्कृष्ट ऐतिहासिक माहिती सांगितली. ही माहिती ज्यानें
ऐकली असेल त्यास श्री. करकरे यांनी इतिहासाचा किती श्रमपूर्वक अभ्यास केलेला आहे,
याविषयी शंका राहणार नाही. या माहितीवरून हिंदुस्थानच्या इतिहासाच्या घडामोडीच्या
कारणांविषयोंहि त्यांनी आपले कांहीं सिद्धांत बसविले आहेत व ही माहिती व हे सिद्धान्त
एकत्र यथित करून ते " मराठ्यांचा इतिहास " ह्मणून तीन तीनशें पानाच्या चवदा,
पंचरा, भागांच्या ग्रंथांत सुसंगतपणे मराठ्यांचा प्राचीन काळापासून अगदी अर्वाचीन
काळापर्यंत साय इतिहास लिहून काढणार आहेत. श्री. सरदेसाई यांच्याशिवाय
सर्व उपलब्ध तुटक तुटक नयी माहिती श्रमपूर्वक संकलित करून सरळ इतिहास लिहून
काढण्याचा प्रयत्न मराठीत दुसन्या कोणीहि आजवर केला नव्हता; पण या कामाची
अत्यंत गरज आहे, आणि हैं संकलित इतिहास लेखनाचें काम इतिहासाची साधने उपलब्ध
करून घेण्याइतके किंबहुना असल्यास त्याहून थोर्ड अधिकच कठिण आहे व हैं काम
एकानेंच नव्हे तर अनेकांनी आपआपल्या दृष्टीने व वेळोवेळी अधिकाधिक साधनें
उपलब्ध होतील तसतसें करीत गेले तरच महाराष्ट्रासारख्या प्रदेशाचा खरा उत्कृष्ट इतिहास
काही दिवसांनी तयार होण्याची आशा आहे. या दृष्टीने श्री. करकरे यांचे काम अत्यंत
स्तुत्य आहे यात शंका नाहीं व इतकें कष्टाचे काम हाती घेतल्याबद्दल आह्नी श्री. करकरे
यांचे अभिनंदन करितों व सुंदर माहिती भरलेल्या श्री. करकरे यांच्या ग्रंथास महाराष्ट्र
आश्रय देऊन श्री. करकरे यांस आपले अंगिकृत दुर्घट कार्य पार पाडण्यास समर्थकल
अशी आशा बाळगतों. श्री. करकरे यांच्या ग्रंथाचा पहिला माग प्रसिद्ध झाला असून
दुसरा भाग छापत आहे व त्यात आणखी आश्रयदात्यांची गरज आहे.
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
" वन्हाडांतील प्रसिद्ध वर्तमानपत्र "
उदय-अमरावती. मंगळवार ता० ११ जुलै सन १९२२.