[१३] पुणे येथील डेक्कन व्हर्ज्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटीकडून या ग्रंथाच्या दुसऱ्या भागास चाळीस रुपये बक्षीस मिळाले, त्यासंबंधींच्या पत्राचा उतारा. ॥ श्री ॥ नं. ४७७ सन १९२३ २४ डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटीचें ऑफिस, पुणे शहर ता. ५१२ सन १९१४. रा. रा. दत्तात्रय बाळकृष्ण करकरे यांस- वि. वि. या संस्थेकडून आश्रय मिळावा ह्या हेतूनें आपलें ता. २७७३।१९२३ चे अर्जासोबत पाठविलेलें पुस्तक मराठ्यांचा इतिहास भाग २ रा याचें परीक्षण होऊन ता. ३१ १ जानेवारी सन १९२४ रोजीं भरलेल्या व्यवस्थापक मंडळीचे सभेनें असें ठरविलें। आहे कीं, संस्थेनें आपणास सदर पुस्तकाबद्दल रुपये ४० चाळीस बक्षीस द्यावे व आपण संस्थेस सदर पुस्तकाच्या आणखी दोन प्रती द्याव्या. सबब ह्या पत्रासोबत पाठविलेल्या बिलाच्या चारी प्रतींवर पेनसलीने 'सही' असें लिहिलें आहे तेथें सह्या कराव्या व पेनसलीनें फुली केली आहे तेथें तारखा घालाव्या आणि सदर सर्व प्रति इकडे ताबडतोच परत पाठविण्याचें करावें. पुस्तकाच्या प्रती व बिलाच्या प्रती आपणाकडून आल्यानंतर पुढील व्यवस्था होऊन सुमारें एक महिन्यानें बक्षीसाची रक्कम आपलेकडे मनी- ऑर्डरीनें पाठविण्यांत येईल. कळावें, लोभ करावा हे विनंति सही इंग्रजी चिटणीस.
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१५
Appearance