असल्यामुळे त्याची याठिकाणी द्विरुको करण्याचेंही कारण नाहीं. बुन्हा निजामशहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहीम निजामशहा हा गादीवर बसला; परंतु चारच महिन्यांत तो मारला गेला; व राज्याचा प्रधान मिआन अंजू यानें इब्राहीमचा तान्हा मुलगा बाहादुर यास चावंदच्या किल्ल्यांन प्रतिबंधांत ठेवून, आणि अहंमद या नांवाच्या एका बारा वर्षाच्या मुलास गादीवर बसवून तो स्वतः राज्यकारभार करूं लागला. यावेळी एकलासखान वगैरे सरदारमंडळींनी मिआन अंजू यास अशी सल्ला दिली की, इमाहीम शहाचा मुलगा बाहाद्दर यास गादीवर बसवावें, आणि राज्याचा कारभार चांदबिबी हिच्या हवाली करावा; परंतु ही सल्ला मिन अंजू यास पसंत पडली नाहीं; व त्याने वर लिहिल्याप्रमाणे, अहमद या नांवाचा एक बारा वर्षांचा मुलगा दौलताबाद येथील किल्ल्यांत प्रतिबंधांत होता, ल्यास तेथून आणून त्याची निजामशाही गादीवर स्थापना केली. इतक्यांतच अहंमद हा निजामशाही वंशांतील खरा वारस नाहीं, असा वाद उपस्थित झाला; तेव्हां एकलासखान वगैरे मंडळींनीं व हमशी लोकांनी मिआन अंजू याचा पक्ष सोडिला व दुफळी उत्पन्न होऊन मोठ्या जोराचे तंटे सुरू झाले. तेव्हां मिआन अंजू यानें, अकबराचा मुलगा शहाजादा मुराद हा गुजराथच्या सुभ्यावर होता त्यास आपल्या मदतीस बोलाविलें. तथापि तो अहंमदनगर येथे येऊन पोहोंचण्यापूर्वीच मियान अंजू यानें एकलासखानाचा पूर्ण पराजय केला होता. त्यामुळे मुगद यास आपण उगाच आपल्या मदतीस बोलाविलें, असें त्यास वाहूं लागलें होतें; तथापि झाली गोष्ट परत येत नाहीं असें समजून त्यानें राजधानीचा बचाव करण्याचे मनावर घेतले; शिवाय किल्ल्यांत धान्यसामुग्री व दारूगोळा मुबलक भरलेला असल्यानें बंदोबस्ताची बहुतेक व्यवस्था झाल्यासारखीच होती ह्मणून त्याने राज्याचा सर्व कारभार चांदचिची हिच्या हवालीं सोपविला; अहमदनगर येथील किल्ला मनसारखान या नांवाच्या सरदाराच्या हवाली करून त्याच्या बंदोबस्ताची व बचा- वाची कामगिरी त्याच्याकडे सोपविली; आणि शहाजादा मुरादविरुद्ध अदिलशाही व कुत्बशाही राज्याची मदत मिळविण्याकरितां तो अहंमद यास बरोबर घेऊन राजधाना सोडून निघून गेला. तथापि चांदी है। अहंमद यास " निजामशाहीचा राज्यकर्ता " असें कबूल करण्यास तयार नव्हती; ह्मणून मिमान अंजू राजधानी सोडून जातांच तिनें किल्ला व शहर संरक्षणाचे काम स्वत:कडे घेतले; अनसारखानाचा वध करविला; बहादूर या नांवाच्या एका मुलास गादीवर बहवून त्याच्या नांवाची द्वाही फिरविली. समशेरखान हबशी व. अबदुलतान बोरिशी वगैरे प्रमुख सरदारांस आपल्या पक्षांत ओढून घेतलें व तिने स्वतः राज्यकारभार चालविण्यास प्रारंभ केला.
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१३८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १११ )