Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११२ )

 चांदबिबी ही मोठी शूर व अलौकिक स्त्री निर्माण होऊन गेली असल्यामुळे च दक्षिणेतील इतिहासाशी तिचा निकटचा संबंध असल्यामुळे, तिच्यासंबंधी या ठिकाणीं भोडीशी अधिक हकीकत देणें अवश्यक आहे. ही लोकोत्तर स्त्री विजापूरचा प्रसिद्ध बादशहा अली अदिलशहा याची पत्नी व अहमदनगरचा बादशहा हुसेन निजामशहा याची कन्या असून तिचा जन्म अजमार्से इ० सन १५४७ मध्ये झाला. ही स्त्री मोठी सौंदर्यसंपन्नही होती. विजापूरकर अल्ली अदिलशहा हा गादीवर बसल्यानंतर - कारकीर्द इ० सन १५५७ पासून इ० सन १५८० पर्यत - ३० सन १५६४ मध्ये ह्मणजे दक्षिणें- तील मुसलमानी राज्यकर्त्यांनी आपसांत एकोपा व सख्य करून विजयानगरकर राम- राजास पालथा घालण्याकरितां जो एक प्रचळ कट तयार केला, त्याच्या थोडेच दिवस अगोदर चांदबिबीचें अली अदिलशहाशी लभ झालें व तिला सोलापूरचा केला आंदण देण्यांत आला. चांदबिबी ही विजापूर येथे गेल्यावर, ती तेथें अली- अदिलशहा यास राज्यकारभार चालविण्यांत मदत करीत असे व त्याच्या बरोबर ती अश्वारुढ होऊन युद्धसंग्रामासही जात असे. त्यामुळे तिच्या आंगीं वरूत असलेल्या शौर्य- साहसादि गुणांची तिच्या पूर्ववयांतच चोहोंकडे प्रसिद्धी झाली होती. त्याप्रमाणेच तिला फारशी व अरबी भाषांचें उत्तम ज्ञान असून, शिवाय मराठी व कानडी भाषाही अव- गत असे. त्याप्रमाणेच चित्रकला व संगितशास्त्र यांचीही तिला उत्तम माहिती होती. इ० सन १५८० मध्ये अली अदिलशहा याचा एका खोजानें खून केला; त्यास पुत्र- संतती नव्हती; त्यामुळे त्याने आपल्या मृत्यूनंतर आपला भाऊ तहमास्प याचा नऊ वर्षांचा अज्ञान मुलगा इब्राहीम यास गादीवर बसवून आपल्या पत्नीनें सर्व राज्य- कारभार चालवावा अशी योजना केली होती. त्याप्रमाणे इब्राहीम हा गादीवर येऊन चांदबिबी ही प्रधान कामिलखान याच्या मदतीनें राज्यकारभार चालवू लागली; रंतु कामलखानाने सर्व सत्ता बळकाविण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिनें त्यास कामा- वरून काढून टाकिलें व त्याच्या जागी किश्वरखान या नांवाच्या सरदाराची नेम- णूक केली; तथापि तोही कामिलखानाप्रमाणेच सर्व सता बळकविण्याचा प्रयत्न करूं लागला; तेव्हां त्यास कामावरून काढून टाकून बंकापूरचा सुभेदार मुस्तफाखान यास त्या जागेवर नेमावें असा चांदबिबीने बेत केला; परंतु कोणी विश्वासघात करून ही बातमी किश्वरखानास कळविली, तेव्हां त्यानें मुस्तफाखान यास ठार मारिलें; चांद- बीबीस कैद करून व तिची अनोशय अप्रतिष्ठा व मानहानी करून तिला सातारा येथील किल्ल्यात प्रतिबंधांत ठेविलें व अज्ञान बादशहा इब्राहीम याच्या नांवानें तो स्वतः राज्यकारभार चालवू लागला. (६० सन १५८२ च्या सुमारास ) पुढे लव-