Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११० )

अल्ली, व मिरानमहंमद बाहर हे दोन; व तिसऱ्या एका स्त्रीपासून झालेला मुलगा हैदर ऊर्फ शहा हैदर असे पांच मुलगे होते. बुन्हाणशहाच्या मृत्यूनंतर त्याचा वडील मुलगा हुसेन निजामशहा हा इ० सन १५५३ यावर्षी - गादीवर आला.

 हा शहा गादीवर आला, त्यावेळी तो तेरा वर्षांचा होता; या शहाच्या कार- कांदर्तिलि अत्यंत महत्वाची गोष्ट ह्मणजे " विजयानगरच्या राज्याचा न्हास " ही होय. इ० सन १५६४ मध्यें अहंमदनगर, विजापूर, बंदर व गोवळकोर्डे वगैरे दक्षिणेतील मुसलमानी राज्यांच्या राजकर्त्यांनी संगनमत करून तालांकोटच्या नैऋत्येस सुमारें तीस मैलांवर विजयानगरकर रामराजाबरोबर युद्ध केलें; व त्यांत त्याचा पराभव करून व त्यास ठार मारून त्यांनी ते राज्य नष्ट करून टार्किलें; यो युद्धातून विजयी होऊन हुसेन निजामशहा हा अहंमदनगर येथे परत आल्यावर लवकरच (ता० ७ माहे जून इ० सन १५६५ रोजी)मृत्यू पावला. त्यावेळी त्याचे वय चोवीस वर्षांचे होतें, त्यास चार मुलगे व चार मुली अशी आठ अपत्ये होती; त्याच्या मृत्युनंतर त्याचा अज्ञान मुलगा मुर्तुजा निजामशहा हा गादीवर आला.

 मूर्तुजा निजामशहा ( इ० सन १५६५ ते ३० सन १५८६ ) मिरान हुसेन निजामशहा ( इ० सन १५८६ ते ३० सन १५८८ ) इस्माईल निजामशहा ( इ० सन १५८८ ते ३० सन १५९१ ) बुन्हाण निजामशहा दुसरा ( इ० सन १५९१ ते इ० सन १५९४ ) या चारी राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीत मराठ्यांचा राजकीय उत्कर्ष झाल्याचें आढळून येत नाहीं, व त्यांच्या कारकीर्दीतील महत्वाच्या गोष्टींचा मार्गे उल्लेख आला


 टीप १:- या बाबतीत भा० इ० सं० मंडळाच्या नवव्या संमेलनांत के प० न० पटवर्धन यांनी एक निबंध वाचला, त्याचा सारांश असा आहे की, "ज्या लढाईत मुसलमानी संघ व अलिया रामराज यामध्यें कृष्णानदीच्या काठी घनघोर संग्राम होऊन विजयानगरचा विध्वंस झाला, त्या लढाईस, “तालीकोटची लढाई " या नांवानें ओळखतात. (कै.) गो० का० चांदोरकर मुळे यांनी संपादिलेल्या बखरीत राक्षस तागडी असे नांव आहे. नुकत्याच सांपडलेल्या कानडी बखरीतही रक्कस तागडी असे नाव आहे. राक्षसतागडी हा रसगी व तंगडगी या जोड नांवाचा अपभ्रंश आहे. ही दोन्ही गांव एकमेकांपासून ८-१० मैलांच्या अंतरावर कृष्णानदीच्या कांठी आहेत. मि० सिवेल यानें सुचविलेलें इंगलगी है गांवही येथून जवळच आहे. तालीकोट पासून २५-३० मैलांपर कृष्णेच्या काठी वरील गांवी लढाई झाली असतां व मराठी कानडी बखरीतून वर्णिलेल्या रणक्षेत्राची जागा वरीलप्रमाणे निर्णित होत आहे; तेव्हा यापुढे या युद्धास " तालीकोटचे युद्ध" असें न ह्मणतां “रक्कसगी तंगडगी येथील युद्ध" हेच ह्मणणे इतिहासास धरून होईल.