इमारतीत पुष्कळ खोल्या व दिवाणखाने काढिलेले आहेत; त्याप्रमाणेंच अनेक दवाखाने, हमामखाने, पाठशाळा व भिक्षागृहें या शहाच्या कारकीर्दीत बांधली गेली; यापैकी दवाखाने व हमामखाने चालविण्यास त्याने मोठमोठ्या नेमणुका करून दिल्या होत्या. या शहाचें दरबारच्या व इतर लोकांनींही अनुकरण केलें व हैदराबाद शहरात अनेक मोठमोठे वाडे बांधण्यांत आले. त्याप्रमाणेच या शहास बागबगीच्यांची विशेष आवड असे, त्यामुळे त्यानें इल्ली महाल बाग, महंमदी बाग वगैरे अनेक बागा तयार करविल्या; व त्यांच्या- प्रमाणेच सरदार, अमीर उमराव, सावकार व श्रीमंत लोक यांनीही चढाओढीनें अनेक बागा तयार केल्यामुळे या शहरास लवकरच अतीशय शोभा आली; शहत्ि अतीशय वस्ती वाढल्यामुळे जागेस अतीशय किंमत पडू लागली व ते सरकारी उत्पन्न इतके वाढले की, या एका शहराच्याच घरफाळ्याच्या उत्पन्नाची रक्कम दरसाल चार लाख रुपये येऊ लागली. शिवाय या शहार्ने योग्य कायदे करून आपला अंमल कोणत्याही प्रकारें अनीति अथवा जोर जुलूम न करिता उत्तमप्रकारें चालू ठेविला होता. या शहास अनेक हिंदू राज्यकर्त्यांशी युद्धे करावी लागली, आणि त्याच्या कारकीर्दीत अनेक हिंदूराज्ये नष्ट झाली, अथवा नष्टप्राय स्थितीत जिवंत राहिली; तरी त्यांच्याबरोबर युद्धप्रसंग घडवून आणण्यांत त्यानें आपण होऊन केव्हाही आगळीक केली नव्हती; आणि आपल्या प्रजेच्या सुखाची वृद्धी करण्याकडे- सच तो आपला कालक्षेप करीत होता. या शहाच्या कारकीर्दीत एकंदर ७८ लाख होना लोकोपयोगी कामाकडे खर्च झाले व साठ हजार होन त्याने गरीब लोकांना धर्मादाय हणून दरसाल खर्च केले; झणजे साडे तीन रुपयांचा होन या भावाच्या प्रमाणाने ७८ लाख होनांचे २ कोटी ७३ लक्ष रुपये व या शहाने ३४ वर्षे राज्य केले; त्या अवधीत दरसाल गरीब लोकांना धर्मादाय ह्मणून ६० हजार होन ह्मणजे ७१ लक्ष ४० हजार रुपये - ह्मणजे एकंदर ३ कोटी ४४ लक्ष ४० हजार रुपयांची रक्कम या शहाने आपल्या कारकीर्दीत लोककल्याणाकरितां खर्च केली. यावरून हा शहा आपल्या प्रजेची किती काळजी घेत असे याबद्दल कोणासही योग्य अनुमान करितां येईल. हा शहा-चौर्तास वर्षे राज्य करून आपल्या वयाच्या ४९ व्या वर्षी एकाएकी आजारी पडून इ० सन १६११ च्या अखेरीस मृत्यू पावला व त्याचा मुलगा अब्दुल्ला हुसेन कुल्यशहा हा गादीवर आला.
या शहाच्या कारकीर्दीत ३० सन १६३७ मध्ये शहाजहानने अहंमदनगर येथील निजामशाही राज्याचा शेवट करून निजामशहास व त्याच्या इतर साथीदारांस पकडून आया येथें नेकन केन ठेविलें व विजापूरकर महंमद आदिलशहा याने शहाजहान यास नियमीतपणें