दरसाल खंडणी देण्याचें कबूल करून तह केला. त्याचवेळी अबदुल्ला हुमेन कुत्वशा यानेही बादशहास नियमीतपणे खंडणी देण्याचे कबूल केल्यामुळे व शहाजहान याची योग्य मर्जी राखिल्यामुळे, त्याने कु· बूशाही राज्यास अथवा शहास कोणत्याही प्रकारें उपसर्ग दिला नाहीं; परंतु इ० सन १५५६ या वर्षी एक विशेष गोष्ट घडून येऊन त्यामुळे मोगलांची फौज कुत्बशाही राज्यावर चाल करून आली. या शहाचा मुख्य वजीर मीरजुम्ला हा पूर्वी जव्हेरी असून तो विशेष कर्तृत्ववान व हुषार असल्या- मुळे, तो राजकीय बाबतींत पडल्यानंतर लवकरच महादास पोहचून त्याची सर्व दक्षिणप्रतिति प्रख्याती झाली होती; व इ. सन १५५३ मध्ये अवरंगझेब हा दक्षिण प्रांताचा सुभेदार असल्या वेळेपासूनच मिरजुम्ला यानें त्याच्याशीही सख्यत्वं संपादन केलें होतें; त्यामुळे अवरंगझेबाचीही त्याच्यावर विशेष मेहेरबानी होती. मरिजुम्ला यास महंमद अमीन या नांवाचा एक मुलगा असून तो वाईट चालीचा होता. या मुलाने, मरिजुम्ला हा तैलंगण प्रांतांत एका स्वारीवर गेला असतां, शहास राग येण्यासारखें कांहीं वाईट कृत्य केलें, त्यामुळे शहाने त्यास प्रतिबंधांत ठेविलें. पुढें मीरजुम्ला हा स्वारीवरून परत आल्यावर त्यानें या मुलास सोडविण्याची पुष्कळ खटपट केली; परंतु ती व्यर्थ गेली. तेव्हा शहाजहान व अवरंगझेब या उभयतांनाही त्याची माहिती असल्यानें त्यानें त्याच्या आश्रयास जाण्याचा निश्चय केला; व शहाजहान बादशाहाकडे याबद्दल कागाळी केली. अवरंगझेब हा साभाविकरीत्याच मोठा महत्वाकांक्षी व मसलती असल्यामुळे कुत्बशाही राज्यांत आपला हात शिरक- विण्याची आलेली ही संधी व्यर्थ दवडूं नये, हणून त्याने शहाजहान बादशहास मीर- जुम्ला याच्या तर्फे शिफारस केली; व शहाजहान यास आपल्या मुलाचें हैं योग्य वाटून त्यानें मीरजुम्ला याच्या मुलास ताबडतोच प्रतिबंधांतून मुक्त करावें " असा शहास हुकूम पाठविला; परंतु शहाजहान बादशहानें आपल्या राज्याच्या अंतर्व्यवस्थेच्या बाबतींत केलेल्या या ढवळाढवळीमुळे आपल्या स्वातंत्र्यावर घाला आला असें पाहून शहास अतीशय राग आला; त्यानें महंमद अमीन यास अधिक बंदोबस्तानें प्रतिबंधांत ठेविलें आणि मरिजुम्ला याची सर्व मालमत्ता जप्त केली. शहाजहान यास ही बातमी समजल्यावर त्यासही अब्दुला हुसेन कुत्बशहा याच्या या कृत्याबद्दल अतीशय संताप आला व त्याने अवरंगझेबास कुत्यशहावर चाल करून जाऊन त्याच्याशी युद्ध करण्याचा हुकूम दिला. त्याप्रमाणे अवरंगशेब हा बादशाही सैन्यासह तिकडील प्रदेशांन दाखल होऊन मोंगली सैन्यानें तिकडे धुमाकूळ उडविला. तेव्हा शहा नाइलाजानें अवरंशेबास शरण गेला; मीरजुम्ला याची जप्त केलेली
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१२७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०० )