शहाने त्याचा मुलगा किथनराज यास त्यानें शहाचे मांडलीक राहून त्यास खंडणी देत जाण्याचे कबूल केल्यावरून त्याच्या वडिलांच्या गादीवर बसविलें व वैजनाथ- देवाप्रमाणेच ज्या इतर राज्यकर्त्यांनी स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचाही शहाने पराभव करून व त्यांना पुन्हां आपल्या पूर्ण नियंत्रणाखाली आणून, तिकडील प्रांतांत शांतता स्थापन केली व तिकडे आपला निर्वेध अंमल पूर्वीप्रमाणे कायम केला.
वरील हकीकतीवरून या शहाच्या कारकीर्दीतील हिंदूच्या व मराठ्यांच्या राजकीय स्थितीबद्दल योग्य अनुपान करितां येईल. एकंदरीत पाहतां महंमद कुली कुत्बशहा हाही पुष्कळच योग्यतेचा राज्यकर्ता होऊन गेला, असें ह्यणण्यास हरकत नाहीं. इब्राहीम कुत्बूशहाच्या कारकीर्दीत गोवळकोंडे शहराची अतीशय भरमराट झाली होती व लोकवस्तीनें तें शहर अतीशय गजबजून गेलें होते; परंतु अतीशय दाट वस्ती झाल्यामुळे तेथील हवा बिघडली व त्याठिकाणी पाण्याचाही विशेष तुटवडा भासूं लागला; ह्मणून महंमद कुली कुत्बशहानें इ० सन १५८९ या वर्षी तेथून पांच कोसांवर मुशी नदीच्या काठी एक स्थळ पसंत करून तेथें नवीन राजधानीची स्थापना केली आणि आपली आवडती स्त्री भागावती हिच्या स्मरणार्थ त्याने या शहरास भागानगर " असे नांव दिले; व पुढे महंमदाचा मुलगा हैदर याच्या नावावरून त्या शहरास हैदराबाद " हें नांव पडलें हेंच ठिकाण हल्लीं निझामच्या राज्याच्या राजधानीचे शहर असून तेथील सावकार मंडळींत अजूनही या शहरास भागानगर असें णतात व मराठ्यांच्या इतिहासांत लि पत्रे, यादी " वगैरे सर्व सरकारी दरबारी, पत्रव्यवहारांतही या शहराचा भागानगर " या नांवानेंच उल्लेख केलेला आढळतो. हैं शहर वसवितांना प्रारंभीच सरळ व रुंद रस्ते आंसून व रस्त्यांच्या दुतर्फा झाडांच्या रांगा लावून तेथें सुंदर घरे बांधण्यांत माली. गोवळकोंडे शहराच्या वरील बाजूस नदीस मोठें धारण बांधून नळाने सर्व भागानगर शहरमर मुबलक पाणी आणून खेळविण्यांत आहे; त्यावेळेपासून त्या शहरास पाण्याचा भरपूर पुरवठा होऊन तो आजतागायत तसाच चालू राहिलेला आहे. याशिवाय, महंमद कुली कुत्बशहाने या शहरांत इल्लीमहालचा वाडा, नौबतघाटाचा वाडा, कुहटूरचा वाडा, नद्वी महालचा वाडा वगैरे अनेक वाडे व सुंदर इमारती बांबविल्या, त्याप्रमाणेच " जुम्मामशीद नांवाचें एक मध्य व शोभिवंत असें मुसलमानांचे प्रार्थनामंदीर त्यानें बांधविलें. याशिवाय शहराच्या मध्यभागी " चोर मिनार " या नांवाची एक उत्तम इमारत त्यानें बांधविली असून ती मोठी भव्य आहे; व तिच्या मध्यभागी घुमट व खाली जमीनीवर एक सुंदर कारंजें आहे. शिवाय तिच्या चारी बाजूस चार उंच मनोरे असून या