Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९७ )

 अशा रीतीनें मुकुंदरायाचा निकाल लागला; परंतु त्याच्याच चिथावणीवरून व्यंकटपतीने शहाच्या ताब्यांतील कोंडचीड या प्रांतावर स्वारी केली होती; म्हणून त्याचे शासन करण्याकरिनां शहानें एदिलखान बंगी या नांवाच्या एका सरदारास त्याच्यावर पाठविलें, परंतु मुसलमानांचें हें प्रचंड सैन्य पाहतांच व्यंकटपतीनें भिकन आपल्या एका वकिलाच रोचर मौल्यवान् नजराणे देऊन त्यास शहाकडे पाठविलें; आणि कोंडचीड प्रांतांत मी स्वारी करण्याच्या उद्देशाने आलो नसून त्या प्रतितिलि 66 कमम " सगेवर पाहण्याकरितां आलों होतों, असें कळविले; - ( कमम है सरोवर अतीशय मोठें व विशेष प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय आहे; हे सरोवर सोळा मैल परीघाचे असून त्यास पुष्कळ लहान लहान नद्या मिळतात व गुत्ताकमम या नांवाची एक बरीच मोठी नदी याच मरोवरापासून उगम पावून दोनशें तीस मेल वहात जाऊन मेलोर जिल्ह्यांतील (मद्रास इलाखा ) अनगोळ या शहरावरून मूठा- વિકા या गांवाजवळ समुद्रास मिळाली आहे. ) तेव्हां शहानें एदिलखान बंगी यास 'तुझी व्यंकटपतीवर हल्ला करू नये, " असा हुकूम पाठविला. इतक्यांत रेडीवड लोकांनी राजमहेंद्री व बेंगळूर येथे बंड उभारिले, तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी तिकडे जाण्याचा एदिलखान यास शहानें हुकूम दिला; तेव्हां त्यानें त्या प्रदेशांत जाऊन रेड।वड लोकांचा पाठलाग चालविला; परंतु त्यांचे अजमासें दोन हजार लोक एका नदीच्या पलिकडे जमावानें सज्ज राहिले व तो नदी उतरण्याचा मुसलमानी सैन्याचा प्रयत्न ते एकसारखा निष्फळ करू लागले, तेव्हा राजमहेंद्री येथून तोफा व बाण आणविले; तथापि ती नदी उतरल्याशिवाय त्यांचा काहींच उपयोग होईनासा झाला. अशा रीतीनें उताराची जागा रेडविड लोकांनी अडवून धरिल्यामुळे तशी दुसरी उताराची जागा शोधून काढण्याकरितां चोहोंकडे माणसें खाना करण्यांत आली. त्यांत बाबाजीराव, धर्माजीराव या उभयतां हिंदू मार्ग- शोध- कांनी मुसलमानी सैन्याच्या छावणीपासून दहा मेलांवर एक उताराची जागा शोधून काढिली व त्या ठिकाणाहून मुसलमानी सैन्य सहज व सुरक्षितपणें नदी ओलांडून पलीकडे गेलें; त्यानंतर डीवड लोकांवर कुत्बशाही सैन्याने मोठ्या निकराने हल्ला केला व त्यांचा पुष्कळ नाश करून या बंडाचें पूर्ण निर्मूलन करण्यांत आलें.

 स्वाप्रमाणेच पुढे मोगल बादशहा जहांगीर याच्या कारकीर्दीत शहाजादा खरम ( भावी प्रसिद्ध बादशहा शहाजहान ) याने जेव्हां दक्षिणेवर स्वारी केली त्यावेळी वैजनाथ देवाने या संधीचा फायदा घेऊन स्वतंत्र होण्याकरितां महंमद कुली कुल्बूशहा याच्याबरोबर युद्ध सुरू केलें, परंतु त्यांत त्याचा पराभव होऊन तो मारला गेला; तेव्हां
१३