Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९०)

अलीकडे येऊन बेजवान्यापासून दहा मैलांवर असलेल्या कंडापिली या किल्लावर हल्ला करून आसपासचा बराच प्रदेश उध्वस्थ करून टाकिला; झणून कुल्यूशहानें त्यांच्यावर इमादउद्दीन महमद शिराझी या नांवाच्या सरदारास त्याच्या बरोबर एक मोठें सैन्य देऊन, तिकडे रवाना केलें. त्याप्रमाणे तो कृष्णानदी उतरून त्यानें प्रथम इणकोंडचा किल्ला घेतला; तेथून तो कचलको टच्या किल्ल्यावर चाल करून गेला. 'त्या किल्ल्यावर कस्तूरी रंगय्या व मुदनाचनय्या हे दोघे सरदार- दहा हजार फौजेसह रहात होते, त्यांनी कोणत्याही प्रकारें प्रतिकार न करितां इमादउद्दीन यास तो किल्ला सोपवून दिला. त्यानंतर कमपचा किल्ला घेऊन तो कोंडबीड या किल्ल्यावर गेला. त्याठिकाणी कुंडी तिमण्णा, मुदनाचनय्या व कस्तूरी रंगय्या असे तिघे सरदार तीस हजार फौजे- सह तयारीनें राहिले होते; त्यांनी मोठ्या शौर्यानं व चिकाटीनें कित्येक महिने किल्ला लढ- विलास कुत्बशहाच्या पुष्कळ सैन्याचा नाश केल्यानंतरच त्यांनी नाइलाजाने तो अखे रीस इमादउद्दीन याच्या हवाली केला. याच ठिकाणीं विजयानगरकर प्रसिद्ध रामराजा याचा जांवई कंपूरी तिमराज हा इमादउद्दीन याच्या हातीं सांपडला ( इ० सन १५८९. ) या अलौकिक विजयामुळे इब्राहीम कुत्बशहाचा अंमल थेट समुद्रकिनान्यापर्यंत कायम झाला व त्या प्रदेशांतील हिंदू राज्यें नामशेष होऊन गेलीं.

 यानंतर एकच वर्षांत, इ० सन १५८० मध्ये इब्राहीम कुल्बशहा हा मृत्यू पावला. या शहाच्या मृत्यूची हकीकत मोठी चमत्कारिक आहे; ती अशी की, इब्राहीम- शहाने आपल्या दक्षिणेकडील सरहद्दीवरील हिंदू राज्यांचा बंदोबस्त केल्यानंतर आपल्या आसपासच्या मुसलमान राज्यकर्त्यांचा प्रतिकार करण्याकरितां त्यानें आपला सेनापती अमीरशहा मीर यास तिकडे पाठविलें, मुरारराव या नांवाच्या एका दक्षिणी बाह्मणास त्याने आपला मुख्य प्रधान नेमून त्यास दहा हजार पायदळ सैन्याची खास तैनात व नोब- तीचा मान दिला आणि अशा रीतीनें प्रत्यक्ष राजघराण्यांतील इतर मंडळीहूनही अधीक असे मुराररावाचे महत्त्व वाढून तो सर्व राज्यांत श्रेष्ठ बनला; परंतु तो हिंदू व त्यांतही ब्राह्मण असूनसुद्धां हिंदू नव्हता व ब्राह्मग्रही नव्हता, असें त्याच्या कृतीनेच सिद्ध झालें. मुरारराव हा मुख्य प्रधान झाल्यानंतर तो फौज घेऊन बल्लारीपासून त्रेसष्ट मैलांवर असलेल्या अदोनी या गांवीं गेला; आसपासचा प्रदेश उध्वस्त करून तेथील लोकांस लुटिले; अदोनी येथील प्रसिद्ध व साक्षात्कारी देवस्थानावर धाड घालून देवाचें जडजवाहीर व सोन्यारुप्याचे दाग- दागिने, बुचाडून घेतले; देवाची रत्नजडित मूर्तीही स्थानमष्ट करून व ती आपणाबरोबर घेऊन तो गोवळकोंडे येथें परत आला व ती त्यानें इब्राहीमशहा यास दाखविली; परंतु ही मूर्ति पाहताच शहाची प्रकृति एकदम बिघडली व तो आजारी पडून लवकरच ६० सन