आह्मांस फार छळ आहे; करितां त्यास आमच्या स्वाधीन करा ह्मणजे आझीं हैं बंड मोडून आपणांस शरण येतों " असें नाईकांनी शहाकडे बोलणें लाविलें. मुस्तफाखान हा मोठा शूर व इमानी सरदार होता; व शहाच्या हिताकरितां स्वतःचा प्राणही अर्पण करण्याची त्याची तयारी होती. त्यामुळे तो आपण होऊनच बंडवाल्या नाईक- मंडळच्या स्वाधीन होण्यास तयार झाला; परंतु शहाने ती गोष्ट साफ नाकारून त्यास या कृयापासून परावृत केले; आणि नाईक मंडळीस कौल देऊन शेवटीं त्या सर्वांना ठार मारून त्यानें हा बंडावा मोडून टाकिला.
त्यानंतर इब्राहीम शहाचा सरदार रिफतखान यानें इ० सन १५६७ या वर्षी पटापूर व राजकुंडी येथील राजा सीतापति व राजनरेंद्री येथील राजा विदियादी यांना जिंकिलें; त्यावेळी त्या राज्यकर्त्याबरोबर तहाची कलमें ठरविण्याकरितां रिफतखानाने आपल्या येलू पंडित या नांवाच्या ब्राह्मण कारकुनास त्यांच्याकडे पाठविले होते, असा उल्लेख आढ ळतो. वरील राज्यकर्त्यांप्रमाणेच गोपाळपली व वीरगुतम येथील राजा व्यंकटराज, कामकोट येथील राजा सूर्वराज व त्याचा भाऊ बिलंदर, ओढ्या प्रांतांतील विदिद्याद्रीचा राजा बेलप, चंदुरबारचे राजे, नरसिंग व त्याचा भाऊ सूरसिंग, राज- महेंद्रीकडील कंडू देवपल्ली येथील बलाढ्य राजा वैजनाथदेव, या सर्व हिंदूराजांनां रिफत- खानाने जिंकून त्यांच्याासून खंडणी घेतली व कुली कुत्बशहाच्या काळापासून ह्यावेळे - पर्यंत अनेक हिंदू राज्यांचा नाश होऊन त्या सर्व प्रदेशावर मुसलमानांचे वर्चस्व स्थापन झालें.
त्यानंतर लवकरच निजामशाही व आदिलशाही फौज कुल्यशाही फौजेवर चाल करून गेली; त्यावेळीं त्या फोजेंत मराठे वर्गीस्वारांची एक तुकडी पिछाडीस ठेवि लेली असून त्यांन विश्वासराव बसवंतराव व कोळीराव हे तीन हिंदू सरदार आपआपल्या सहा सहा हजार स्वारांसह हजर होते; त्यांनी इतर सैन्याबरोबर कुत्बशाही सैन्यावर हल्ला केला होता; परंतु त्यांत त्यांचे पुष्कळ कोळी सैन्य मारले जाऊन अखेरीस निजामशाही व अदिलशाहीच्या सैन्याचा पराभव झाला व कुत्बशहास विजय प्राप्त होऊन तो गोवळकोंडे येथें परत गेला.
पुढे विजयानगरकर श्रीरंगरायावर विजापूरकर आदिलशहानें स्वारी केली; यावेळी श्रीरंगरायास सुदेवानें इब्राहीम कुत्बशहाची मदत मिळाली ह्मणूनच त्याचा निभाव लागला. मध्यंतरी कुःबूशहा हा इतर मुसलमान राज्यकर्त्यांबरोबर युद्धाच्या भानगडीत गुरफटला आहे असें पाहून त्याचे मांडलीक राज्यकर्ते व्यंकटाद्री, कस्तूरी, तिमराज व नरसिंगराय यांनी त्यास नेहमीप्रमाणे खंडणी न पाठवितां उलट कृष्णानदीच्या
१२