१५८० च्या जून महिन्यांत ता० २ रोजी गोवळकोडे येथें मृत्यू पावला. त्यावेळीं त्याचें वय ५१ वर्षांचे होते. त्याने ३१ वर्षे राज्य केले; त्यास एकंदर तीस मुळे झाली; त्यांपैकी त्याच्या मृत्यूच्या वेळी सहा मुलगे व तेरा मुली जिवंत होत्या. या सहा मुलांपैकी पहिला अब्दुल कादर हा देवरकोंडा येथील प्रतिबंधांत असून तो त्याच ठिकाणी मृत्यू पावला. दुसरा मिर्झाहुसेन कली हा नामपिल्ली येथील तलावात स्नान करीत असतां बुडून मृत्यू पावला. तिसरा महंमद कुली हा इब्राहीम शहाच्या मृत्यूनंतर गादीवर आला; चवथा अब्दुल फत्ते हा पुढे पंधरा वर्षांनी मुत्यू पावला; पांचवा महंमद खुदबंद हा बंड करून सहावा महंमद अमीन हाही पुढे आपल्या वयाच्या २५ प्रतिबंधांत मृत्यू पावला व या वर्षी मृत्यू पावला.
माहीम शहा हा मोठा थोर व लोकिकवान् राज्यकर्ता होऊन गेला; या शहाच्या कारकीर्दीत हिंदू व मराठे लोकांना पुष्कळच राजकीय महत्व प्राप्त झाल असें झणण्यास हरकत नाहीं. हा शहा मोठा पराक्रमी व यशस्वी असून त्यास युद्धांत कधींही फारसा अपजय आला नाहीं, तो प्रत्यक्ष मोहिमेवर असतांना सुद्धां त्याच्या लष्करांत विद्वान् मंडळीचें निवासस्थान असे व त्यांच्याशीं तो कायदा, शास्त्र वगैरेसंबंधी संभाषण व वादविवाद करीत असे. शिवाय त्यानें आपल्या राज्यांत, चोन्या, दरवडे व रस्तालुटी वगैरेसंबंधी अतीशय कडक बंदोबस्त केला होता; त्यामुळे असे गुन्हे क्वचितच घडत, प्रसिद्ध तैलंगी चोरांवर त्यानें इतका विल- क्षण दरारा बसविला होता की, त्याच्या लोखंडी हातानें त्यांचे निर्मूलन झाल्यासारखें होऊन नावही ऐकू येईनासे झाले होते; आणि एखाद्या दुर्बल खीनेही सोन्याचे भांडे आपल्या डोक्यावर घेऊन गोवळकोंड्याहून राज्यांत कोणत्याही दिशेस निर्भयपणानें। जानें इसका कडक बंदोबस्त ठेविल्याबद्दल त्याची ख्याती होती. त्याच्या राज्यविस्ता- रांत कासिमकोटा, राजमहेंद्री व कोंडबीड हे महत्वाचे व मुख्य हणून गणले जाणारे प्रदेश होते; या शहाने अनेक सुंदर व भव्य इमारती बांधिल्या - गोवळकोडे येथील तटबंदी, माहीमबाग, फुलबाग, लंगर (भिक्षागृह) इब्राहीमपत्तनचा तलाव, हुसेनसागर तलाव, बडवळ येथील बांध, गोवळकोंडे येथील काळा चबुत्रा व यांशिवाय पुष्कळ मशीदी व विद्यालयें या शहाच्या कारकीर्दीत बांधण्यांत आली. त्याप्रमाणेंच गोवळकोंडे येथे व्यापाराची अतीशय भरभराट होऊन सर्व देशांतून त्याठिकाणी माल येऊन उतरू लागला, अरथस्थान, तुर्कस्थान व इराण येथील व्यापारी त्याठिकाणीं व्यापाराचा क्रयविक्रय करण्याकरितां येऊ लागले; व पाहिजे तो जिन्नस गोवळ- कोई येथे मिळू लागला. या शहाच्या वेळी प्रजेची अतीशय आस्थापूर्वक दाद