Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८८ )

देवराव हे अदिलशहाच्या मदतीस आले व त्यांनीं कुत्बशहा व निजामशहा यांच्या सैन्यास अतीशय त्रस्त करून सोडिलें, त्यामुळे त्या उभयतांनी अदिलशाहीस दिलेला शह परत घेतला, आणि इब्राहीम कुत्बशहा तर मोठ्या कष्टानेच गोवळकोंडे येथे आपल्या राजधानींत परत येऊन पोहोंचला.

 त्यानंतर इब्राहीमशहानें व्यंकटाद्रि व जगदेवराव यांच्यावर पुन्हां मुजाहिदखान या नांवाच्या सरदारास, त्याच्या बरोबर सैन्य देऊन पाठविलें व त्यांच्यामध्ये बरेच दिवस युद्ध सुरू राहिलें. तेव्हां इकडे रामराजानें कॉडबीडचा राजा सिंदराज तिमप्पा यास पन्नास हजार स्वारांनिशीं कंडापिली, मच्छलीपट्टण ही ठाणीं व आपला जांवई तुमराज यान देवाककोंडा व इंद्रकोंडा हीं ठिकाणें हस्तगत करून घेण्यास पाठविलें व आपण स्वतः गोवळकोंब्याच्या आसपास लुटालूट करूं लागला; इकडे जगदेवरावानें नाईक लोकांस फितवून पानगल, कोविलकोंडा व गणपुरा हे किल्ले आपल्या हस्तगत करून घेतले, आणि काशीराव या नांवाच्या मराठा किल्लेदारानें इंद्रकौडा हा किल्ला तुमराजाच्या स्वाधीन केला अशा रीतीनें इब्राहीम कुत्बशहा हा आपल्या राजधानींत कोंडला गेला; तेव्हां या युद्धाचा एकदांच काय तो सोक्षमोक्ष करून घ्यावा या विचारानें शहानें तारापल्ली येथे शत्रूवर हल्ला करण्याचा निश्चय केला. इतक्यांत त्यास अल्ली बेरीदशहाकडून गुप्तपणें असा निरोप आला की, " जगदेवरावास वश करून घेतल्याशिवाय तुझास फायदा होणार नाहीं; ह्मणून त्यास वश करून घेण्याची पहिल्यानें आवश्यमेव खटपट करावी. " त्याप्रमार्णे शहानें मुस्त. फाखानामार्फत जगदेवरावास वश करून घेतलें, तेव्हां गणपुरा व पानगल हे दोन किल्ले त्यानें आपणाकडे ठेवून घेऊन मोठ्या मुत्सद्दीपणानें हैं पुष्कळ दिवस चाललेलें युद्ध बंद केले व या मुसलमान राजकर्त्यांचा आपसांत सलोखा करून दिला. थोडक्यांत ह्मणजे मराठा साम्राज्य स्थापन करण्याचा मराठ्यांनी पुढे लवकरच जो एक प्रयत्न करून यशस्वी- पणानें सिद्धीस नेला, त्याचा हा पूर्वरंगच होय, असे या मराठा सरदाराच्या कर्तबगारीवरून णण्यास हरकत नाहीं. या काळानंतरच्या इतिहासांत जगदेवरावाचें नांव आढळून येत नाहीं; त्यामुळे या सरदाराची पुढील हकीकत कळण्यास मार्ग नाहीं.

 गोवळकोंडे येथील मुसलमानी राज्याच्या सैन्यांत जगदेवरावाच्या काळापासून हिंदू व मराठे लोकांचा विशेष भरणा झालेला होता. त्यापैकीं हिंदू नाईक मंडळींनी इमाहीम- शहा शिकारीस गेला आहे अशी संधी साधून मोठें बंड उभारले व किल्ल्याचे दरवाजे बंद करून त्यांनी मुसलमान लोकांची कत्तल करण्यास सुरवात केली. तेव्हां दोन मुसलमा- नानीं तटावरून उड्या टाकून इब्राहीम कुत्बशहाकडे जाऊन त्यास हे वर्तमान कळविलें, त्याबरोबर शद्दा लागलाच परत आला व स्याने किल्ल्यास वेढा दिला. त्यावेळी " मुस्तफाखानाने