मुसलमान सरदारांचा पदोपदीं उपमर्द करूं लागला. तेव्हां सर्व मुसलमान सरदारांनी त्याबद्दल शहाकडे पुन्हां गान्हाणी केली व " जगदेवराव व रायराव या दोन हिंदू अधिकान्यांवर आपण विशेष भरवसा ठेवून वागतो याचा नीट विचार करा; कारण लष्करात बहुतेक सर्व नाईक लोक असून ते जगदेवरावाच्या केवळ मुठीत आहेत. " असे त्यास सागितलें, तथापि शहाने यावेळीही त्यांच्या ह्मणण्याकडे लक्ष दिलें नाहीं. नंतर रायरावाविषयीं शहाकडे अतीशय कागाळ्या येऊं लागल्या; आणि याच संधीस जगदेवरावाचा भाऊ व्यंकटराव हा शहाचा निरोपट्टी न घेता आपल्या जहागिरीवर निघून गेला. त्यामुळे शहास या उभयतांविषयी संशय उत्पन्न झाला व त्याने पहिल्या सपाट्यास रायरावास पकडून ताबडतोब ठार मारिले. त्याबरोबर जगदेवराव घाबरून आपणाबरोबर दोन तीन हजार सैन्य घेऊन गोवळकोंडे येथून निसटला व एलगुडल वरून सर्व प्रदेश उजाड करीत तो वन्हाड प्रातांत जाऊन दाखल झाला. जगदेवराव हा मोठा शूर व प्रसिद्ध सरदार असल्यामुळे बुन्हाण इमादशहाने त्यास आपल्या पदरीं ठेवून घेऊन दहा हजार स्वारांची सरदारों दिली; व खानदेशचा सुलतान मिरान महंमदखान याजबरोबर चाललेलेल्या युद्धावर त्यास पाठविलें त्याप्रमाणे त्याने तिकडे जाऊन खानदेशच्या सुलतानाचा पूर्णपणे पराभव केला; पुष्कळ लूट मिळविली आणि चहाड प्रांतांतील इतर कित्येक लहान लहान संस्थानिकांनाही त्यानें शहाच्या अंकित होणे भाग पाडिलें; शिवाय त्याने स्वतंत्र होण्याच्या उद्देशाने आपल्या जहागिरति तीन हजार स्वार व इराणी, हबशी, अरब वगैरे लोकांचें बरेंच पायदळ नोकरीत ठेविले व खानदेश आणि बन्हाड येथील उभयतां सुलतानांनांही तो डोईजड झाला. तथापि बु-हाण इमादशहाच्या विनंतीवरून, त्या शहाला कोणत्याही प्रकारें त्रास न देता तो विजया- नगरला जाण्याच्या इराद्याने पुन्हा इब्राहीम कुत्बशहाच्या ताब्यांतील एलगुड या गांवाकडे आला, त्यावेळीं इराणी व हबशी पाँच हजार सैन्य, तीनशे हत्ती व शिवाय दक्षिणी पायदळ सैन्य त्याच्याबरोबर होतें. जगदेवराव हा पुन्हां आपल्या राज्याच्या हद्दीत आल्याचे इब्राहीम- शहा यास समजताच त्याने आपला सरदार मुस्तफाखान यास त्याच्यावर पाठविलें, व उभयतांमध्ये मोठ्या निकराचे युद्ध होऊन त्यांत जगदेवरावाचा भाऊ व्यंकटराव व इतर चार सरदार ठार होऊन त्याच्या सैन्याचा अतीशय नाश झाला व त्याचा पूर्ण पराभव होऊन तो विजापूर येथे पळून गेला. इतक्यांत हुसेन निजामशहा व इब्राहीम कुत्बशहा यांनी विजापूरकराच्या प्रदेशावर स्वारी केली व कल्याणीच्या किल्ल्यास वेढा दिला; तेव्हा विजापूरकर अली अदिलशहा यानें बेदरकर अल्ली बेरीदशहा विजयानगरकर रामराजा साह्य मागितलें. त्याप्रमाणे बेरीदशहा व रामराजातर्फे त्याचा भाऊ व्यंकटाद्वि व जग-
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/११४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८७)