Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८२ )

कोंकणांतील है राज्य पुढे इ० सन १४६९ मध्ये बहामनी राज्यांतील प्रसिद्ध सरदार व मुत्सद्दी महंमद गवान यानें नष्ट केलें व तिकडे मुसलमानी अंमल चालू केला.

 बहामनी राज्यापासून उत्पन्न झालेल्या पांच राज्यांपैकीं वन्हाडची इमादशाही ही फत्तेउल्ला इमादशहा या नांवाच्या एका शूर पुरुषानें स्थापन केली. हा मूळचा विजयानगर येथील एका तेलंगी ब्राह्मणाचा मुलगा होता. विजयानगरच्या राज्यकर्त्यांबरोबर चाललेल्या युद्धांत तो मुसलमानांच्या हातीं सांपडला व त्यानंतर त्यानें मुसलमानी धर्माची दीक्षा घेतली. बहामनी राज्याचा आधारस्तंभ असलेला प्रसिद्ध मुत्सद्दी महंमद गवान याची त्यानें मेहेरबानी संपादन केली; इमाद-उल-मुल्क हा किताब व वन्हाडची सुभेदारी त्यानें मिळविली इ० सन १४८४ मध्ये " इमादशहा " हें नांव धारण करून तो स्वतंत्र झाला. हे राज्य अल्पकाळ जिवंत राहिले व पुढे लवकरच इ० सन १५७२ मध्ये निजामशाहसि जोडलें गेलें; त्यामुळे या राज्यांत मराठ्यांचा उत्कर्ष होण्यास फारशी अवधीच मिळाली नाहीं; व त्यांना या औटघटका जिवंत राहिलेल्या राज्यांत विशेष राजकीय महत्व प्राप्त झाल्याचा उल्लेखही आढळून येत नाहीं.

 बहामनी राज्यापासून निर्माण झालेलें दुसरें राज्य ह्मणजे बेदरची बेरिदशाही ही होय. या घराण्याचा मूळपुरुष काशीम बेरीद हा पहिल्याने महंमदशहा बहामन याच्याजवळ गुलाम होता, या शहाच्या कारकीर्दीत पेटण आणि चाकण यांच्या दरम्यान साबाजी या नांवाच्या एका मराठा नाईकाच्या प्रमुखत्वाखाली मराठ्यांनी बंड केलें; तेव्हां तें मोडण्यासाठी शहानें काशीम बेरीद याची तिकडे रवानगी केली. त्याप्रमाणें काशीमर्ने तिकडे गेल्यावर साबाजीशी युद्ध करून त्यास ठार मारिलें; व तें बैंड साफ मोडून टाकिलें. त्यामुळे महंमदशहानें संतुष्ट होऊन साबाजीच्या ताब्यांतील सर्व प्रदेश काशीम यास बक्षीस दिला व साबाजीच्या मुलीचें काशीमचा मुलगा अमीर याच्याशी लग्न लावून दिलें ( काही ठिकाणीं साबाजीच्या मुलीचें लम खुद काशीमशींच झाले, असाही उल्लेख आढळतो. ) यावेळी साबाजीच्या फौजेंतील अजमासें चारशे मराठे कासीमच्या नोकरीत राहिले; व त्यांपैकी बहुतेकांनी मुसलमानी धर्माचा स्वीकार केला. या मराठा सैन्यावर कासीमचा अतीशय विश्वास व मेहेरबानी असे व त्याच्या अमला- खालील प्रदेशांत व त्याच्या दरबारांतही या मराठा सैन्याचें पुष्कळच राजकीय महत्व असे. त्यामुळे अदिलशाही, निजामशाही व इमादशाहीप्रमाणेच या सैन्याच्या बळावर च या तीन्हीही राज्यकत्यांच्या अनुमतीने आपणही स्वतंत्र व्हावे असा त्यानें घाट घातल इ० सन १४९२ मध्ये तो बेदर येथें स्वतंत्रपणे राज्य करूं लागला. तो बारा वर्षे - राज्य करून इ. सन १५०४ मध्ये मृत्यू पावला व त्याचा मुलगा अमीर बेरीद हा गादीवर