आला; याच्याच कारकीर्दीपासून ( इ० सन १५०४ - १५४९ ) या राज्यास उतरती कळा लागण्यास मोठ्या झपाट्यानें प्रारंभ झाला, आणि अली बेरीद शहाच्या कारकीर्दीत ( इ० सन १५४९-१५९२ ) तें राज्य नष्ट झाले. हैं राज्यही बन्हाडच्या इमादशाही- प्रमाणेच अल्पकाळ अस्तित्वात राहिलेलें असल्यामुळे त्यांत मराठ्यांचा विशेष उत्कर्ष होण्यास अवसर मिळाला नाहीं.
बहमनी राज्यापासून निर्माण झालेले तिसरें राज्य, ह्मणजे गोवळकोंडे येथील कुत्यूशाही राज्य हैं होय. या घराण्याचा, मूळपुरुष कुली कुत्बशहा हा इराणमधील एका प्रमुख जातींत, हमदान प्रतितिील सय्यदाबाद या गांवीं जन्मास आला. हा मनुष्य लहानपणापासूनच मोठा हुषार व चलास असून तो आपल्या चुलत्याबरोबर दक्षिणेत आला व सुलतान महंमदशहा बहामनी याच्या आश्रयास राहिला. पुढे एके रात्रीं महंमदशहा हा आपल्या दरबारी मंडळीसह गाणे ऐकत बसला असतां दक्षिणी व बसी लोकांनी त्याच्यावर एकाएकीं हल्ला केला; त्यावेळीं कुली कुल्बूशहा व दुसरी दहा परदेशी मंडळी यांनी मोठा पराक्रम करून न्यास सुरक्षीतपणे किल्ल्यांत नेऊन पोहोंच- विलें; त्यामुळे शहाचा जीव बचावला; तेव्हांपासून त्याची कुली कुल्बूशहावर, नतीशय मर्जी बसली व त्यानें कुशहास " मलिक, -कुत्बू - उल्मुल्क् " असा किताब देऊन ध्यास आपल्या राज्याचा दुय्यम बजार नेमिलें; पुढे मलिक दिनार या सरदारावरील, स्वाति त्याने पराक्रम गाजविल्यामुळे शहानें महंमद गवान याच्या शिफारशी करून, व त्यास " अमीर-उल्- उमराव " असा किनाब देऊन तैलंगण प्रांतावर सुभेदार नेमिलें कोसगीर व उदगीर हे दोन गांव त्याच्या खास तैनातीस लावून दिले; ( इ० सन १४९५ व त्याप्रमाणें तिकडील प्रांताचा तो कारभार पाहू लागला.
त्यानंतरच्या काळांत एका बंडांत दोन हिंदू सरदारांचा नामनिर्देश आढळतो कोंकणांनाचा सुभेदार बहादूरखान गिलनी यानें महंमदशहा विरुद्ध बंड उभारिलें; तेव्हां महंमदशहा, कुली कुल्बू शहासह त्याच्यावर चाल करून गेला, आणि बहादूरखान हा मिरज येथील किल्ल्यांत आहे असें पाहून त्याने त्या किल्ल्यास वेढा दिला तेव्हां बहादूरखानाकडील सरदार पोटानाईक व त्याचा मुलगा देव नाईक यांनी कुत्बशहाच्या सैन्यास एकीकडे घेऊन त्याच्याशी मोठ्या निकरानें सायंकाळपर्यंत युद्ध केलें; व त्याचा पूर्ण पराभव करण्याची वेळ आणिली. इतक्यांत पोटानाईकाचा मुलगा देव नाईक अकस्मात युद्धांत मारला गेला व पोटानाईक त्या दुःखाने इताश होऊन शहास शरण येऊन त्याने मिरजचा किल्ला कौलानें शहाच्या स्वाधीन केला. नंतर कुली- कुमशहा हा तेलंगण प्रतिति आपल्या सुभेदारीवर जाऊन तिकड़ील कारभार पाहूं