Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८१)

 दादाजी नरसिंह हा तिकडील कारभार पाहूं लागल्यावर त्यानें खटाव, ललगून व मलवडी येथील देशकुळकर्णाचें काम नारायण हरी या नांवाच्या मनुष्याकडे सोपविलें व त्यावर स्वतः देखरेख ठेवून कामराज घाटगे याच्या देशगतीची— ह्मणजे देशमुखी वतनाची—उत्तम व्यवस्था चालू राखिली व तिकडील सर्व बंडावे मोडून शांतता स्थापन केली. एकंदरीत पाहतां दादाजी हा मनुष्य मोठा हुषार व शहाच्या विशेष मेहेरबानी- तील असावा, असें दिसतें, तथापि त्याच्याविषयीं याहून अधिक माहिती उपलब्ध नसून तो पुढे कधीं मृत्यू पावला, हेही बरोबर समजून येत नाहीं.

 सुलतान अल्लाउद्दीन शहाच्या कारकीर्दीतील मलिक-उत्-तुजार याच्या इ० सन १४५३ मधील कोंकणपट्टीवरील स्वारींत व महंमद गवान याच्या इ० सन १४६९ मधील त्या प्रदेशावरलि स्वारींत " शिर्के " हें नांव आलेले आहे. हे घराणे फार जुनें, उच्चप्रतीचें विशेष प्रसिद्ध व सातारा आणि कोल्हापूर येथील छत्रपतींच्या नात्यांतील असून मराठी राज्याच्या काळांत त्यांनी पुष्कळच महत्वाची कामगिरी बजाविली आहे. त्यामुळे या घराण्यासंबंधीही याठिकाणी थोडक्यांत उल्लेख करणें आव- श्यक आहे. अँड डफ यानें आपल्या मराठ्यांच्या इतिहासांत (पान २७ पहा. ) शिक्यांसंबंधीं असें लिहिलें आहे कीं, तेराव्या शतकाच्या प्रारंभी, ह्मणजे ज्यावेळी सिंघण राजानें पन्हाळ्याच्या राजाचें राज्य जिंकून घेतलें त्यावेळी, कृष्णानदीच्या उगमासभोवतालचा प्रति ज्या पाळेगाराने हस्तगत करून घेतला त्याचेच शिर्के हे वंशज आहेत; परंतु डफ यानें आपल्या या लिहिण्यास पुष्टिकारक आधार दिलेला नसल्याने त्या माहितीवर कितपत भरंवसा ठेवावा हा प्रश्नच आहे. उलटपक्षी उपलब्ध असलेल्या निरनिराळया माहितीवरून व पुष्टिकारक आधारावरून शिर्के हे महाराष्ट्रांतील अति प्राचीन क्षत्रीयकुलातील उच्चप्रतीचे मराठे आहेत असेंच सिद्ध होत आहे; व हीच माहिती, अँड डफच्या लिहिण्याहून अधीक सयुक्तिक व ग्राह्य मानणें आवश्यक आहे.

 या शिर्के घराण्यांतील मूळ पुरुषाचें नांव वज्जपाळ हैं असून तो सचीवाच्या ताब्यांतील मुझे खोन्यांतील शिरकवली या गांवीं जंगलांत शिरकाई देवीवें स्थान आहे तेथें जाऊन राहिला; त्याठिकाणीं असतां त्यानें शिरकाई देवीस प्रसन्न करून घेतलें; पुढे तळकोंकणांत जाऊन त्याने तिकडील ८४ गावें आपल्या हस्तगत करून घेतली; त्यानंतर या घराण्याने कोंक ती पुष्कळ प्रदेश आपल्या ताब्यतां मिळवून ते तिकडे स्वतंत्रपणे राज्य रू लागले व साताऱ्या जिल्ह्यांतील कुंभारली घांटाच्या दक्षिणेस सावर सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर बहिरवगड हणून एक किल्ला आहे त्या- ठिकाणी त्यांनीं आपल्या राहण्याचें व सर्व व्यवस्थेचें मुख्य ठाणें ठेविलें शिक्याचें
११