Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४१1) बंद झाली तरी हो जानेझरी पलटण कायम ठेवण्याच्या उद्देशानें, दरसाल सर्व ख्रिस्तानी मिळून दोन हजार बालवयाची विस्ती मुलें आटोमन सुलतानाच्या नोकरींत देत जावीं, असा त्यांनी त्यांच्याकडून करार करून घेतला होता. ही मुलें आठ वर्षांची असतांनाच निवडून घेत असत; व त्यांना उत्तम लष्करी शिक्षण देऊन त्यांची स्वतंत्र " जानेशरी " पलटण ठेवण्यांत येत असे; आणि तिच्याकडेसच बादशहाचें खास शरीरसंरक्षण, त्याचा गजवाडा, किल्ला व राज्य यांचे संरक्षण, परराज्या- बरोबरील युद्धे, वगैरेंची महत्वाची कामगिरी सोपविलेली असे, हा प्रघात सतत तीनशें वर्षे चालू राहिला, परंतु पुढे तुकांच्या सत्तेस ओहोटी लागल्यानंतर तो बंद पडला. अशा रीतीनें ही गुलामगिरीची पद्धत मुसलमानानीं भव्यत्रमाणति प्रचारात आणिली; तथापि " गुलाम" या शब्दाचा अर्थ मुसलमान व ख्रिस्तीलोक निरनिराळा करीत असत, " 'गुलाम " हा शब्द कानाला चमत्कारिक लागतो, मनाला चमत्कारिक चाटतो व तो मनुष्याच्या हीनस्थितीचा द्योतक आहे, असा मनांत एकदम विचार उत्पन्न होतो; पण मुसलमानी राज्यांत गुलामास कित्येक वेळी मुलांहूनही अधिक प्रेमानें वागविल्याची उदाहरणें आहेत; आणि गुलामही आपला धनी सोडून त्याच्या परवानगीनें सुद्धां नवीन धन्याकडे जाण्यास नाखुप असून प्राणघातापर्यंत त्याची मजल गेल्याचें उदाहरण आहे. मूर्तिजा निजामशहा यानें गोवळकोंडेकर इब्राहिम कुतुबशहा याची कुमक मिळवून अल्ली बेरीदशहावर स्वारी करण्याचे ठरविलें. तेव्हा अल्ली बेरीदशहानें, विजापूरकर अल्ली आदिलशहाकडे कुमक मागितली, परंतु त्यानें, मला अमके दोन खोजे गुलाम याल तरच मदत करितों" अशी अट घातली. तेव्हां नाइलाजानें बेरीद- शहानें त्या विवक्षित दोन गुलामांना आदिलशहाकडे जाण्यास सांगितलें, परंतु त्यांना आपल्या धन्यास सोडून जाण्याची इच्छा नसल्याने ते तिकडे जाण्यास खुपी नव्हते, तथापि बेरीदशहाने त्यांना तसेंच जबरीने तिकडे पाठविलें; ह्मणून त्यापैकी एकानें विजापूर येथे पोहोचल्यावर पहिल्याच मुलाखतीत अल्ली आदिलशहास ठार मालि ( इ० सन १५८० ) त्याप्रमाणेच मुसलनानी राजघराण्यात व दरबारातही गुलामांचे अतिशय महत्त्व असून राज्यकर्त्यांची अदलाबदल करण्याइतके त्यांचे वर्चस्व परमावधीस गेलें असल्याचेही आढळते. शिवाय याच ": गुलाम (" वंशाने इ० सन १२०६ पासून इ० सन १२८८ पर्यंत दिल्ली येथें राज्य केले आहे आणि आजपर्यंत जगांत मुसलमानी समाजातील ज्या तीन स्त्रियांनी राज्यपदाचा उपभोग घेतला, त्यांतील एक स्त्री याच गुलाम वंशांतील होती असा इतिहासात दाखला आहे. ती स्त्री म्हणजे सुलतान अल्तमश याची पराक्रमी, बुद्धिमानू, कर्तृत्ववान व हुषार मुलगी सुलताना रेशिया ही 46